Download App

Tourinism ची आवड असलेल्यांसाठी रेल्वेत सरकारी नोकरी, थेट मुलाखत, पगार 35,000 रुपये

Tourinism monitors Job : भारतीय रेल्वेचे (Indian Railways)जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात आणि भारतभर भ्रमंती करतात. अनेकांचं रेल्वे विभागात काम करण्याचं स्वप्न असतं. तुमचंही IRCTC मध्ये सरकारी नोकरी करण्याचं ध्येय असेल किंवा तुम्हाला टुरिझमची आवड असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) या भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीकडून काही रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. (INDIAN RAILWAY CATERING AND TOURISM CORPORATION LIMITED Tourinism monitors job 2023)

पर्यंटन मॉनिटर्स या पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख 11 जुलै 2023 असेल.

पदाचे नाव – पर्यटन मॉनिटर्स

एकूण जागा – 05

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव-
उमेदवार हा पर्यटन विषयात 3 वर्षांची बॅचलर पदवी उत्तीर्ण असावा. तसेच कोणत्याही शाखेतील 3 वर्षांची पदवी आवश्यक आहे. ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये 1 वर्षाचा डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेतून 3 वर्षाची बॅचलर पदवी आवश्यक आहे. उमेदवारांनी पदाच्या सर्व अटी व शर्ती पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

पगार – रु. 35,000/- दरमहा

आवश्यक कागदपत्रे-
बायोडेटा,10वी, 12वी आणि पदवी प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधार कार्ड, परवाना), पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

आमदारांच्या पत्नींना इमोशनल ब्लॅकमेल केलं जातं; अजित पवारांकडून शरद पवारांचा समाचार 

वयोमर्यादा –
उमेदवारांचे वय 28 वर्षापेक्षा जास्त नसावं. आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली.

मुलाखतीचा पत्ता-

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IHM) IHMCTAN, वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई 400 028

मुलाखतीची तारीख – 11 जुलै 2023

जाहिरात –
https://www.irctc.com/assets/images/WEST%20ZONE%20TOURISM%20MONITOR%20NOTIFICATION%2030-06-2023.pdf

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संकेतस्थळ : https://www.irctc.co.in/nget/train-search

Tags

follow us