आमदारांच्या पत्नींना इमोशनल ब्लॅकमेल केलं जातं; अजित पवारांकडून शरद पवारांचा समाचार

आमदारांच्या पत्नींना इमोशनल ब्लॅकमेल केलं जातं; अजित पवारांकडून शरद पवारांचा समाचार

Ajit Pawar on sharad pawar : आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन अजित पवार (Ajit Pawar) सत्तेमध्ये सहभागी झाले. यानंतर आज त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी बोलतांना अजित पवारांनी शरद पवारांवर (Sharad pawar) टीकेची झोड उठवली. राष्ट्रवादीच्या (NCP) आमदारांच्या पत्नीला भेटून त्यांना इमोशनल केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. (Ajit Pawar on Sharad Pawar senior leader doing emotional blackmail to MLA wifes)

राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी केल्यानंतर अजित पवार यांच्या गटाची आज पहिलीच बैठक झाली. बैठकीत अनेक नेत्यांची जोरदार भाषणे झाले. अजित पवारांनीही भाषण करून शरद पवारांवर टीका केली. ते म्हणाले, मी राजकीय जीवनात काम करत असतांना साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच तयार झालो. याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. ते आमचे श्रध्दास्थान आहेत. पण, वय झालं तरी ते निवृत्त होत नाहीत. तरुणांच्या हाती पक्ष सोपवायला तयार नाहीत. हा कसला हट्ट? असा सवाल त्यांनी केला.

कुठला विठ्ठल अन् कसलं दैवत? : अजितदादांनी काकांनाच राष्ट्रीय अध्यक्ष पदावरुन हटवलं… 

यावेळी ते म्हणाले, आम्हाला साहेबांविषयी आदर आहेच. पण, जनतेला हे कळलं पाहिजे की, काही आमदारांना बोलावून घेतलं जातं. ते भेटले नाहीतर त्यांच्या पत्नींला फोन केला जातो. त्यांना इमोशनल केलं जातं. मी नाव घेत नाही. पण वरिष्ठ नेत्यांनी एका आमदाराला समजवण्याचा प्रयत्न केला. त्यावर तो आमदार म्हणााला, मी दादांना माझा शब्द दिला आहे. मला आमदाराकी नाही मिळाली तरी चालेल. आता आम्ही दादांसोबत राहणार आहोत. शेवटी वरिष्टांनी काय शब्द वारपला तर तू निवडूनच कसा येतो ते बघतो. ज्यांनी पक्ष वाढवला. तुम्हाला साथ दिली त्यांच्याशीच आता ही भाषा पक्षाच्या वरिष्ठांकडून केली जात असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube