Israel Hamas War: इस्रायल आणि हमासमध्ये आता युद्ध सुरू झाले आहे. कोणत्याही युद्धाचा परिणाम हा जगावर होत असते. युद्धामुळे अर्थव्यवस्थेमध्ये मंदीसारखी परिस्थिती निर्माण होते. आता या युद्धाच्या परिणाम लगेच दिसू लागला आहे. त्याचा सकरात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम दिसू लागले आहेत. या युद्धामुळे भारतात सोने -चांदीच्या किंमतीत (Gold and Silver rate) वाढ झाली आहे. पितृपक्ष काळात भारतात मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जात नाहीत. तर शेअर बाजारावरही (Share Market) परिणाम दिसू लागला आहे.
इस्रायल-हमास युद्ध आणखी तीव्र, संपूर्ण गाझा पट्टीला वेढा घालण्याचे आदेश
गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये सोने, चांदीच्या किंमतीत काही प्रमाणात घट होत आहे. सध्या पितृपक्ष सुरू आहे. या काळात सोन्याची किंमती कमी होत असतात. त्यानंतर दसरा, दिवाळीमध्ये पुन्हा सोने, चांदी खरेदी वाढते. त्यामुळे किंमतीत वाढ होते. परंतु आता पुन्हा सोन्याच्या किंमती वाढू लागल्या आहे. आज मंगळवारी सकाळी सोन्याचा भाव हा 57 हजार रुपये प्रती दहा ग्रॅम (तोळा) इतका झाला आहे. तर चांदीची किंमत किलोमागे 68 हजार रुपये इतकी झाली आहे.
Ajit Pawar Vs Sharad Pawar : पवारांनी घरासारखा पक्ष चालवला, लोकशाही नव्हती; अजित पवार गटाचा युक्तिवाद
पॅलेस्टाइन आणि इस्रायलच्या युद्धाच्या परिणाम लगेच कच्च्या तेलावर झाला आहे. कच्चा तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे सोमवारी गुंतवणूकदारांनी वित्तीय आणि उर्जामधील कंपनीच्या शेअरची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे निफ्टीही एका टक्क्याने कमी झाली आहे. या युद्धामुळे बाजारात अनिश्चितता तयार झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार जोखीम घेण्यास तयार नाही.
तर बीएसईचा सेन्सेक्सही 483 अंकांनी घसरला आहे. यात 0.73 टक्के घट झाली आहे. सेन्सेक्स 65, 512 अंकावर बंद झाला आहे. तर निफ्टी 141. 15 अकांनी म्हणजे 0.72 टक्क्यांनी कमी झाली आहे. निफ्टी 19,512.35 अंकावर बंद झाला आहे. सेन्सेक्समधील तीन कंपनीचे शेअरमध्ये वाढ झाली. तर निफ्टीमधील 50 शेअरपैकी 43 शेअरचे नुकसान झाले आहे.