Ajit Pawar Vs Sharad Pawar : पवारांनी घरासारखा पक्ष चालवला, लोकशाही नव्हती; अजित पवार गटाचा युक्तिवाद

Ajit Pawar Vs Sharad Pawar : पवारांनी घरासारखा पक्ष चालवला, लोकशाही नव्हती; अजित पवार गटाचा युक्तिवाद

राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणाचा? यासंदर्भात निवडणूक आयोगात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान, शरद पवारांनी घरासारखा पक्ष चालवला, पक्षामध्ये लोकशाही नव्हती, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला आहे. ही सुनावणी पार पडली असून पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला होणार आहे.

World Cup 2023: न्यूझीलंडसमोर नवख्या नेदरलँड्सचे आव्हान, पाहा प्लेइंग-11

निवडणूक आयोगासमोर आज राष्ट्रवादी पक्षाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान, अजित पवार गटाकडून अॅड. नीरज कौल आणि अॅड मनिंदर सिंग यांनी आपली बाजू मांडली आहे. यावेळी बाजू मांडताना अजित पवार गटाने शरद पवार यांच्यावर वैयक्तिक स्वरुपात आरोप केल्याचं पाहायला मिळालं आहे.

Ramdas Kadam : ‘राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंनी माझ्यावर’.. कदमांचा मोठा गौप्यस्फोट

अजित पवार गटाने काय युक्तिवाद केला?
शरद पवार हुकूमशाहसारखा कारभार करतात, घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवतात.
आमच्याकडे दीड लाखाहून अधिक शपथपक्ष आहेत.
नियमानुसार नियुक्त्या केल्या जात नव्हत्या.
जे स्वतः निवडून आले नाहीत ते इतरांच्या नेमणुका कशा करू शकतात.
राष्ट्रवादीतील सर्वाधिक आमदार आपल्यासोबत त्यामुळे चिन्ह आपल्यालाच मिळावं.
सादिक अली आणि पीए संगमा केसचा दाखला देण्यात आला.
आमच्याकडे 1 लाखांपेक्षा अधिक शपथपत्रं तर शरद पवारांकडे 40 हजार
ज्यांची निवड पवारांनी केली तेच पवारांची निवड कशी करू शकतात?
पक्षात फूट आहे की नाही हे तुम्ही ठरवू शकता
राष्ट्रवादी चिन्ह आम्हालाच मिळावं.

Chhagan Bhujbal : टोलचा वाद पेटला! गडकरींचा किस्सा सांगत भुजबळांनी राज ठाकरेंना सुनावलं

आमदारांचा आकडा नाहीतर नावं सांगा?
निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु असताना अजित पवार गटाच्या वकिलांकडून बाजू मांडली जात होती. यावेळी अजित पवार गटाकडे 1 लाख शपथपत्र असल्याचा दावा वकीलांकडून करण्यात आला. हा दावा करीत असतानाच शरद पवार गटाच्या वकिलांनी आपल्याकडे 40 हजार शपथपत्र असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच शरद पवारांचे वकील अभिषेक मनु सिंगवी यांनी अजित पवार गटाला सुनावणीदरम्यानच सवाल केला आहे. तुमच्याकडे असलेल्या आमदारांचा आकडा नाहीतर नावे सांगावीत, अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी पक्षात उभी फुट पाडून अजित पवार आपल्या समर्थकांसह सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर पक्षात चांगलाच संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे अजित पवार गटाकडून पक्षावर दावा सांगण्यात येतोयं तर दुसरीकडे अजित पवार गटाकडे किती आमदार? हे जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता पुढील सुनावणी येत्या 9 नोव्हेंबरला होणार आहे. पुढील सुनावणीत शरद पवार गटाकडून काय युक्तिवाद करण्यात येणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube