Jawa 42 FJ : भारतीय बाजारात आज जावाने आपली नवीन बाइक Jawa 42 FJ लाँच केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या बाइकची चर्चा भारतीय बाजारात सुरु होती. अखेर आज (3 सप्टेंबर) कंपनीने भन्नाट फीचर्स आणि बोल्ड लूकसह आपली नवीन बाइक Jawa 42 FJ लाँच केली आहे. भारतीय बाजारात ही बाइक आता Royal Enfield Hunter 350 आणि Honda CB350 ला टक्कर देणार आहे. बाजारात ही बाइक कंपनीने 1.99 लाख (एक्स शोरुम) मध्ये लाँच केली आहे. याच बरोबर या बाइकची बुकिंग देखील सुरु करण्यात आली आहे.
Jawa 42 FJ फीचर्स
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने आपल्या नवीन बाइकमध्ये मस्त मस्त फीचर्स दिले आहे. कंपनीकडून या बाइकमध्ये 334cc, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 21.45bhp पॉवर आणि 29.62Nm टॉर्क जनरेट करू शकते. तसेच या बाइकमध्ये स्लिप आणि असिस्ट क्लचसह इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्स देखील देण्यात आले आहे. मात्र अद्याप कंपनीकडून ही बाइक किती मायलेज देणार याबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
कंपनीने Jawa 42 FJ मध्ये आधुनिक रेट्रो थीम दिले आहे. तसेच या बाइकच्या बाजूला ॲल्युमिनियम प्लेट असलेली टीयर ड्रॉप साइजची फ्यूल टाकी देण्यात आली आहे. तसेच साइड पॅनेल्स ब्रँडच्या इतर Jawa 42 प्रमाणेच आहेत.
‘हा’ संविधानाचा अपमान, नाना पटोलेंचा जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल
Jawa 42 FJ मध्ये मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स, ब्लॅक-आउट इंजिन आणि अपस्वेप्ट एक्झॉस्ट पाईप बाइकचा स्पोर्टी लुक देण्यात आला आहे. बाजारात ही बाइक सध्या 5 रंगांमध्ये उपलब्ध आहे. याच बरोबर एलईडी लाइट, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि सिंगल-पॉड, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील या बाइकमध्ये देण्यात आले आहे.