Download App

मिठी मारणाऱ्याचा महाराष्ट्रामध्ये कोथळा बाहेर काढला जातो; आव्हाडांचं मुंडेंना प्रत्युत्तर

  • Written By: Last Updated:

Jitendra Awhad on Dhananjay Munde : काल कोल्हापुरातील अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सभेत बोलताना कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांवर (Jitendra Awhad) जोरदार टीका केली. ज्याने कोणी कोल्हापुरात येऊन पायताणाची भाषा केली, त्याला प्रेमाणे जरी मुश्रीफ साहेबांनी मिठी मारली तरी त्याच्या बरगड्या राहतील का, असा सवाल आव्हाडांना केला. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन मुश्रीफ साहेबांवर आरोप कराल तर करवीरनगरीतील जनता माफ करणार नाही, असा इशारा मुंडेंनी दिला. त्याला आता आव्हाडांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शरद पवार गटाने अजित पवार गटातील आमदारांच्या मतदार संघात सभा घ्यायला सुरूवात केली. त्यांनी येवला, बीड, नंतर 25 ऑगस्टला कोल्हापुरात सभा घेतली. कोल्हापूरच्या सभेत बोलतांना आमदार आव्हाडांनी हसन मुश्रीफांवर जोरदार टीका केली होती. गद्दार सापांना कोल्हापूरी पायताण दाखवा, अशी टीका आव्हाडांनी केली होती. त्यानंतर काल आव्हांच्या टीकेला धनंजय मुंडेंनी प्रत्तुत्तर दिल होतं.

आता जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीट करत मुंडेंना जवाब दिला. त्यांनी लिहिलं की, कालच्या सभेत धनंजय मुंडे यांनी हसन मुश्रीफ यांचे नाव घेत त्यांनी जर जितेंद्र आव्हाडांना मिठी मारली तर जितेंद्र आव्हाडांच्या बरगड्या तुटीतल असं भाष्य केलं. कदाचित त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही की, बनवाबनवी करून मिठी मारणाऱ्याचा महाराष्ट्रामध्ये कोथळा बाहेर काढला जातो. हे कायम लक्षात ठेवा, अशा शब्दांत मुंडेच्या टीकेला उत्तर दिलं.

Photos : रेड कार्पेट ते कॅज्युअल डे आऊटपर्यंत रिताभरीचे फॅशनेबल लूक! 

दरम्यान, आव्हाडांच्या टीकेवर आता धनंजय मुंडे काय प्रतिक्रिया देतात हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us