Download App

IREL मध्ये ट्रेड्समन ट्रेनी पदांसाठी भरती सुरू, महिन्याला ८८ हजार रुपये पगार

  • Written By: Last Updated:

IREL Recruitment 2024: तुम्ही सध्या बेरोजगार असाल आणि सरकारी नोकरीच्या (Govt Job) शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.नुकतीच एक बंपर भरती जाहीर झाली आहे. इंडियन रेअर अर्थ लिमिटेडने (Indian Rare Earths Limited) ने भरतीसाठीची विविध पदांच्या भरतीसाठी नुकतीच एक अधिसूचना जारी केली आहे. 12वी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. ‘ट्रेड्समन ट्रेन‘च्या (Tradesman Trainee) काही जागा भरण्यासाठी भरती ही जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, याच भरती प्रक्रियेविषयी सविस्तर जाणून घेऊ.

जितक्या जागा शिंदेंना, तितक्याच राष्ट्रवादीलाही द्या; भुजबळांच्या वक्तव्याने जागावाटपात ट्वि्स्ट! 

‘ट्रेड्समन ट्रेनी’ या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अधिकृत वेबसाइट https://www.irel.co.in/ वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदभरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2024 आहे. आता अर्ज करण्यासाठी फारच थोडे दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळं उमेदवारांनी वेळ दडवता या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करावा. महत्वाच म्हणजे, या भरतीसाठी उमदेवारांना केवळ ऑनलाईन पध्दतीनेच अर्च करावा लागणार आह.

Munmun Dutta : बबिताचा कोलंबियात जलवा; दिलखेच अदा पाहून चाहते फिदा 

रिक्त जागा आणि पदांची संख्या:
इंडियन रेअर अर्थ लिमिटेड ने ‘ट्रेड्समन ट्रेनी’ च्या 67 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे.

शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराची पदनिहाय शैक्षणिक पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली दिली आहे.
लिंक –
https://www.irel.co.in/documents/20126/167125/Detailed+Advt+No.+CO_HRM_26_2023-all+unit_Final_Eng.pdf/a8d2a3df-8fcd-2a68-adf6-d514740d501480180808088

नोकरी ठिकाण: मुंबई
वयोमर्यादा: 35 वर्षे
अर्ज फी: रु 500.

पगार:
ट्रेड्समन ट्रेनी पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना कंपनीच्या धोरणानुसार प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त केले जाईल आणि त्यांना एकत्रित वेतन दिले जाईल. यामध्ये 20,000 रुपये आणि वैद्यकीय सुविधांचा समावेश असेल. तसेच निवडलेले उमेदवार एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रशिक्षणावर असतील; त्यांचा पगार 22,000 ते 88,000 रुपये असेल.

उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा. कारण अर्ज करतांना काही चुका राहिल्यास किंवा अर्धवट भरल्यास अर्ज नाकारल्या जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

follow us