Download App

कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बॅंकेत 17 ‘लिपिक’ पदाची भरती

  • Written By: Last Updated:

बँकेत नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बॅंक असोसिएशन लिमिटेडमध्ये ( Kolhapur District Urban Cooperative Banks Association) लिपिक पदासाठी भरती जाहीर झाली आहे. एकून 17 लिपिक पदाच्या भरतीसाठी ही जाहिरात आहे. या ठिकाणच्या भरतीसाठी इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीबाबत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील सविस्तर माहिती देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बॅंक असोसिएशन लिमिटेडमध्ये लिपिक भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 7 मार्च 2023 रोजी बंद होईल. अशा प्रकारे अर्ज भरण्यासाठी अवघे तीन-चार दहा दिवस शिल्लक आहेत.

कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बॅंक असोसिएशन लि.

रिक्त पदाचे नाव : लिपिक / Clerk

आवश्यक पात्रता :
1) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
2) MS-CIT (समकक्ष प्रमाणपत्र कोर्स) प्राधान्य : JAIIB/CAIIB/GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM / IIBF / VAMNICOM इ.) बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका)
3) अनुभव असल्यास प्राधान्य

एकूण रिक्त पदे : 17

वयाची अट : कमाल 35 वर्षे.

परीक्षा फी : 590/- रुपये

पगार (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 07 मार्च 2023

Kasba By Election : चंद्रकांतदादांना खिजवलं : कोल्हापूरातही धंगेकरांच्या विजयाचा जल्लोष !

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : POST BOX NO. 304, KOLHPAUR CITY H.O. 416012.
● अधिकृत संकेतस्थळ : kopbankasso.com

 

 

Tags

follow us