Maha Food Bharti 2024: आज अनेक जण सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात आहे. मात्र, स्पर्धा इतकी वाढली आहे की, सरकारी नोकरी मिळण्याचं प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होत नाही. त्यामुळंच अनेक जण पात्रता असूनही खासगी नोकरी करतांना दिसतात. दरम्यान, आता तुम्हीही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि नागरी संरक्षण (Maha Food) विभागांतर्गत पुरवठा निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिकाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.
खासदार अफजल अन्सारींना SC चा दिलासा, कृष्णानंद राय हत्या प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती
या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि नागरी संरक्षण विभाग भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव –
पुरवठा निरीक्षक (गट-क)
वरिष्ठ लिपिक (गट-क)
एकूण रिक्त पदे– 345
शैक्षणिक पात्रता –
पुरवठा निरीक्षक: कोणत्याही विषयातील पदवी (अन्न आणि तंत्रज्ञान किंवा अन्न आणि विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य).
वरिष्ठ लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी.
मोदी शाहांविरोधात घोषणा, सभागृहात गोंधळ; डेरेक ओ ब्रायन यांच्यासह काँग्रेसचे पाच खासदार निलंबित
वय श्रेणी –
खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय – 5 वर्षांची सूट.
अर्ज शुल्क –
ओपन/ओबीसी – रु 1000.
मागासवर्गीय/अपंग/आदुघ/दिव्यांग/ अनाथ – 900 रु.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
अधिकृत संकेतस्थळ –
https://mahafood.gov.in/website/marthi/home.aspx
पगार:
1) पुरवठा निरीक्षक, गट-क – रु 29200 ते 92300
2) वरिष्ठ लिपिक, गट-क – 25500 ते 81100
ऑनलाइन अर्ज सुरू होतो – 13 डिसेंबर 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2023
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
१) आधार कार्ड
२) जातीचे प्रमाणपत्र
3) छायाचित्र, स्वाक्षरी
4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर
5) 10वी आणि पदवीची मार्कशीट
जाहिरात-
https://drive.google.com/file/d/1BSXEi_xSQUvE9eZRwFDaqweQl9uSaSoe/view
अर्ज प्रक्रिया: अन्न, नागरी पुरवठा आणि नागरी संरक्षण (Maha Food) विभागांतर्गत केल्या जाणाऱ्या या भरतीला भरतीसाठी उमदेवाराना ऑनलाईन पध्दतीन अर्ज करावा लागणार आहे. या पदभरतीसाठी अर्ज करण्यचाी अंतिम तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वी अर्ज सादर करणं गरजेच आहे. उशीरा आलेले आणि अपूर्ण माहिती असलेले अर्ज नाकारले जातील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.