Download App

उन्हाळ्यात शरीराला डिहायड्रेट ठेवण्यासाठी ‘ही’ पेय नक्की घ्यावी

मुंबई : उन्हाळा सुरु झाला असून अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला डिहायड्रेट ठेवणे देखील महत्तवाचे असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही पेयाबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या साह्याने तुम्ही शरीराला डिहायड्रेट ठेऊ शकतात. उन्हाळ्याच्या या ऋतूत तुम्ही अनेक प्रकारच्या फळांचे ज्युस पिऊ शकतात. यामध्ये तुम्ही टरबूज, किवी, संत्री, स्ट्रॉबेरी इत्यादी फळांचा देखील समावेश करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया या हेल्दी पेयांबद्दल.

टरबूज रस
उन्हाळा सुरू झाला की बाजारात सहजरित्या उपलब्ध होणारे फळ म्हणजे टरबूज होय. विशेष म्हणजे टरबूजात मुबलक प्रमाणात पाणी आढळते. जे तुम्हाला दीर्घकाळ हायड्रेट ठेवण्यास सहज मदत करते. चवीने गोड असलेले हे फळ उन्हाळ्यात तुमची तहान भागवण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे तुम्ही टरबूजाचा रस पिऊ शकता.

लिंबूपाणी
Vitamin C ने उपयुक्त असलेले लिंबूपाणी हे उन्हाळ्यातील उत्तम पेय मानले जाते. उन्हाळ्यात लोकांना लिंबूपाणी प्यायला आवडते. लिंबूपाणी बनवण्याची पद्धत देखील अत्यंत सोपी आहे. तुम्हाला फक्त सोड्यात लिंबू पिळून त्यात काळे मीठ आणि साखर घालायची आहे. तुमचे सुपर एनर्जेटिक उन्हाळी पेय तयार आहे. त्याच बरोबर तुम्ही आपल्या घरातील उपलब्ध असलेल्या पाण्यात लिंबाचा रस मिसळून आपली तहान भागवू शकता.

Ramdas Athawale : पंतप्रधान मोदींचा सामना करणं एड्यागबाळ्याचं काम नाही…

संत्र्याचा रस
संत्री हे व्हिटॅमिन-सीचा एक प्रमुख स्त्रोत मानला जातो. हे उन्हाळ्यातील सर्वोत्तम पेय आहे. उन्हाळा सुरु झाला की या रसाच्या फळाच्या गाड्या तुम्ही रस्त्यावर पाहिल्या असतील. मात्र संत्र्याचा रस तुम्ही घरच्या घरी देखील बनवू शकता. ताज्या संत्र्याचे चविष्ट पेय तुम्ही घरी बनवून पिल्याने बाहेरील धोकादायक रसापासून तुम्ही वाचु शकतात. कारण अनेकदा रस्त्यावरील मिळणारे ज्युस बनवताना आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेतली जात नाही.

लिची
शरीरातील व्हिटॅमिन-सीची कमतरता पुर्ण करण्यासाठी लिची हे फळ उत्तम आहे. उन्हाळ्यात तुम्ही लिचीपासून स्वादिष्ट पेय बनवू शकता. हे फळ इतर अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. लिचीच्या रसात सोडा किंवा ताजी पुदिन्याची पानेही टाकता येतात यामुळे ज्युसला विशिष्ट चव प्राप्त होते.

पाकिस्तानच्या राजकीय वादात अक्षयच्या ‘केसरी’ची एन्ट्री; इम्रान खानच्या ट्विटनं वेधलं लक्ष

स्ट्रॉबेरी रस
अनेकांना हे फळ खायला खुप आवडते. स्ट्रॉबेरी हे दिसायला सुंदर तर आहेच मात्र हे फळ शरीरासाठीही तितकेच फायदेशीर आहे. हे व्हिटॅमिन-सीचा समृद्ध स्रोत आहे. याशिवाय कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक त्यात आढळतात. उन्हाळ्याच्या आहारात तुम्ही स्ट्रॉबेरी ज्यूसचा समावेश करू शकता.

Tags

follow us