Download App

चेहऱ्यावर पिंपल आल्याने पठ्ठ्यानं थेट नोकरीलाच केला रामराम; नेटकऱ्यांना चर्चेसाठी मिळाला नवा विषय

pimple आला म्हणून एका व्यक्तीने चक्क म्हणून थेट नोकरी सोडली आहे.

man quit job because he got a pimple on his face : नोकरी सोडण्याची विविध कारणं असतात. मात्र नुकतीच एक हास्यास्पद पण धक्कादायक गोष्ट घडली आहे. ती म्हणजे एका व्यक्तीने चक्क चेहऱ्यावर पिंपल आला म्हणून थेट नोकरी सोडली आहे. एका कारखान्यामध्ये काम करणारा हा नोकरदार होता. मात्र त्याने आरोग्याशी कोणतीही तडजोड न करत हा निर्णय घेतल्याने सोशल मिडीयावर एकीकडे त्यावर हास्यास्पद तर एकीकडे त्याच्या या निर्णयाचं कौतुक देखील केले जात आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

एका कारखान्यामध्ये इथेनॉल मशिन साफ करणाऱ्या कर्मचाऱ्याचं त्याचं ट्रेनिंग झालं मात्र त्यानंतर त्याला चेहऱ्यावर एक पिंपल आल्याने त्याने नोकरी सोडली आहे. तर नोकरीवर रूजू होण्याआधी त्याची त्वचा अत्यंत नितळ होती. त्याचं लाईफस्टाईल देखील अत्यंत योग्य आहे. तो सकस आहार व्यायाम करतो. त्यामुळे आता हा जो पिंपल आला आहे. तो केवळ आणि केवळ या कारखान्यात काम करताना केमिकलची रिअॅक्शन आल्याने झाल्याचं त्याने सांगितले आहे.

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बदलले! इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर टॅरिफ लावणारच

यावर कंपनीने देखील स्पष्टीकरण दिले आहे. त्यात त्यांनी या नोकदाराच्या राजीनाम्याची गोष्ट सांगितली. तसेच ते म्हणाले की, त्याने नोकरी सोडल्यानंतर 3-4 दिवसांनी एचआर त्याच्या घरी गेल्यानंतर त्याच्या नोकरी सोडल्याचं कारण कळालं. कारण या व्यक्तीने ऑफीसला ब्लॉक केलं होतं. दरम्यान या घटनेनंतर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

WhatsApp वर Blurry Image स्कॅम; सायबर चोरट्यांच्या निशाण्यावर कोण?, कसा कराल बचाव…

एकीकडे त्यावर हास्यास्पद तर एकीकडे त्याच्या या निर्णयाचं कौतुक देखील केले जात आहे. तसेच कामाच्या ठिकाणी कामगार आणि नोकरदारांच्या आरोग्याचा प्रश्न यावर देखील चर्चा सुरू झाली आहे. काम करताना नोकरदारांना आरोग्यास पोषक वातावरण, सुरक्षितता, मोकळी हवा उठण्या बसण्यास योग्य इन्फ्रास्ट्रक्चर, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि केमिकल्स कंपन्यांमध्ये आरोग्यास पोहचणार नाही याची काळजी घेण्यात यावी.

follow us

संबंधित बातम्या