Maruti Suzuki Q2 Result: शेअर बाजारात निकालांचा हंगाम सुरू आहे. यामध्ये देशातील आघाडीची ऑटो कंपनी मारुती सुझुकीनेही (MARUTI SUZUKI ) सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. (Maruti Suzuki India) कंपनीने 3720 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 2062 कोटी रुपये होता. याचा अर्थ वार्षिक आधारावर नफा 80 टक्के वाढला आहे. (AUTO STOCKS ) निकालानंतर स्टॉकमध्ये जोरदार कमाई होत आहे. BSE वर शेअर बाजारात (Stock Market) 3 टक्के वाढीसह 10752 रुपयांवर व्यवहार करत आहे.
एक्सचेंज फाइलिंगमध्ये कंपनीने सांगितले की, दुसऱ्या तिमाहीत उत्पन्न 37060 कोटी रुपये होते, तर अंदाज 37000 कोटी रुपये होता. मारुती सुझुकीचे वर्षभरापूर्वीच्या सप्टेंबर तिमाहीत एकूण उत्पन्न 29931 कोटी रुपये होते.
तसेच नफा देखील वार्षिक आधारावर 2769 कोटी रुपयांवरून 4784 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. दुसऱ्या तिमाहीत मार्जिन वाढून 12.9 टक्के झाले आहे, जे एका वर्षापूर्वी 9.3 टक्के होते. वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे, प्राप्तीमध्ये सुधारणा आणि विक्रीचे चांगले प्रमाण यामुळे मार्जिनमध्ये सुधारणा झाल्याचे बघायला मिळाले आहे.
Ritabhari Chakraborty: रिताभरी चक्रवर्तीची ‘नंदिनी’ आता ओटीटीवर प्रदर्शित
बाजाराला दिलेल्या माहितीत मारुती सुझुकीने सांगितले की, सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीचे इतर उत्पन्न 844 कोटी रुपये होते, जे गेल्या वर्षी याच तिमाहीत 613 कोटी रुपये होते. ही तिमाही विक्रीच्या प्रमाणात उत्कृष्ट होती, जी 55000 पेक्षा जास्त होती. विक्री आणि नफ्याच्या बाबतीत सप्टेंबर तिमाही ही आतापर्यंतची सर्वोत्तम तिमाही होती. कंपनीने सांगितले की, लॅटिन अमेरिका, मध्य पूर्व आणि आफ्रिकेसाठी जिमनी-5 दरवाजांची निर्यात सुरू झाली आहे. कंपनीने भारतातून सुमारे 69000 युनिट्सची निर्यात केल्याचे सांगितले जात आहे.