Stock Market : बाजार नव्या उंचीवर, सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठली विक्रमी पातळी

  • Written By: Published:
Stock Market : बाजार नव्या उंचीवर, सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठली विक्रमी पातळी

Stock Market : शेअर बाजारातील तेजी आजही कायम आहे आणि त्याच्या जोरावर निफ्टी आणि सेन्सेक्सने त्यात नवा विक्रम निर्माण केला आहे. सेन्सेक्सने 67,097.42 या नवीन विक्रमी पातळीवर गेला आहे. सेन्सेक्ससोबतच निफ्टीनेही नवीन ऐतिहासिक पातळी गाठली आहे.( stock market today sensex and nifty at new record)

निफ्टी आज नवीन विक्रमी उच्चांकावर

निफ्टीने नवीन विक्रमी उच्चांक आज गाठला. बाजार उघडताच निफ्टीने 19,851.90 चा उच्चांक गाठला आहे. निफ्टीने प्रथम विक्रमी उच्चांक गाठला आणि त्यानंतर लगेचच सेन्सेक्सनेही नवीन उच्चांक गाठला.

असा उघडला बाजार

आज शेअर बाजार उघडताना BSE च्या 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 109.87 अंकांच्या म्हणजेच 0.16 टक्क्यांच्या वाढीसह 66,905.01 च्या पातळीवर उघडला. याशिवाय, NSE चा निफ्टी 53.70 अंकांच्या म्हणजेच 0.27 टक्क्यांच्या वाढीसह 19,802.95 च्या पातळीवर उघडला.

सेन्सेक्स आणि निफ्टी स्टॉक

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 21 शेअर्स तेजीत आहेत आणि केवळ 9 शेअर्स घसरत. दुसरीकडे, निफ्टीच्या 50 पैकी 35 शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे आणि 15 शेअर्समध्ये घसरण नोंदवली जात आहे.

राज्य विधी सेवा प्राधिकरणात लेखापाल पदांची भरती, पगार 25,000; ‘या’ तारखेपर्यंतच करता येणार अप्लाय

क्षेत्रीय निर्देशांक

निफ्टीमध्ये ऑटो आणि पीएसयू बँक वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक वेगाने व्यवहार करत आहेत. ऑटो इंडेक्समध्ये 0.34 टक्के आणि पीएसयू बँकेत 0.06 टक्के घसरण झाली आहे. माध्यम क्षेत्रात सर्वाधिक 1.46 टक्के वाढ दिसून येत आहे आणि त्यानंतर ग्राहकोपयोगी वस्तूमध्ये 0.94 टक्क्यांची वाढ नोंदवली जात आहे.

या स्टॉकमध्ये तेजी

एनटीपीसी 4.62 टक्के आणि इंडसइंड बँक 1.99 टक्क्यांनी वर आहे. पॉवरग्रिड 1.45 टक्के आणि इन्फोसिस 0.88 टक्क्यांनी वर आहे. टेक महिंद्रामध्ये 0.75 टक्क्यांच्या वाढीसह व्यवसाय होताना दिसत आहे. सेन्सेक्सचे हे टॉप गेनर्स आहेत.

या स्टॉकमध्ये घसरण

M&M 0.7 टक्क्यांनी आणि मारुती 0.49 टक्क्यांनी खाली आहे. एशियन पेंट्स 0.45 टक्के आणि भारती एअरटेल 0.22 टक्क्यांनी घसरले. TCS 0.17 टक्के आणि ITC 0.12 टक्के वेगाने व्यवहार करत आहेत.

प्री-ओपनिंगमधलं चित्र असं होत

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या काळात BSE सेन्सेक्स 86.27 अंकांच्या म्हणजेच 0.13 टक्क्यांच्या वाढीसह 66881.41 च्या पातळीवर व्यवहार करत होता. यासह, NSE च्या निफ्टीमध्ये 52.85 अंक किंवा 0.27 अंकांच्या वाढीसह 19802.10 च्या स्तरावर व्यापार होताना दिसला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube