Meta Layoffs : मंदीचा परिणाम वेगवेगळ्या क्षेत्रांवर होताना दिसत आहे. गेल्या काही काळात जगातील अनेक लहान-मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. त्याच वेळी फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटा आणखी 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. यापूर्वी मेटाने नोव्हेंबर 2022 मध्ये 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.
या कपतीनंतर मेटामधील कर्मचाऱ्यांची संख्या 2021 वर्षांइकती होईल. कोरोनाच्या काळात कंपनीने 2020 पासून जबरदस्त नोकरभरती केली होती. कंपनीने प्रोफेशनल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म LinkedIn च्या माध्यमातून या कपतीची माहिती दिली आहे. जाहिरात सेल्स टीम, मार्केटिंग आणि पार्टनरशिप टीम कर्मचारी कपतीमध्ये असणार आहेत.
आकाश मधवालचा पंच, लखनऊला हरवून मुंबईने गाठली दुसरी क्वालिफायर
मार्चच्या सुरुवातीला कंपनीने सांगितले होते की ते आपल्या नियोक्ता टीमचा आकार कमी करेल आणि एप्रिलच्या शेवटी आपल्या टेक्नोलॉजी टीमतील लोकांना काढून टाकेल. त्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस व्यापारी गटातील लोकांना काढून टाकले जाईल. मेटाचे मुख्य कार्यकारी मार्क झुकरबर्ग म्हणाले, “हे अवघड असेल पण दुसरा कोणताही मार्ग नाही. याचा अर्थ प्रतिभावान आणि उत्साही सहकाऱ्यांना निरोप देणे असा आहे जे आमच्या यशाचा एक भाग आहेत.”