Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी लाभार्थींना (Sukanya Samriddhi Yojana) केंद्र सरकारने एक गुडन्यूज दिली आहे. सुकन्या समृद्धी लाभार्थींना परताव्यात देण्यात येणाऱ्या व्याजदार केंद्र सरकारने वाढ केली आहे. नवीन वर्षापूर्वीच केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना, लहान बचत योजना तसेच तीन वर्षांच्या मुदत ठेवीसारख्या योजनेतील व्याजात काहीशी वाढ केली आहे. सुकन्या समृद्धी योजनेत 0.2 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता या योजनेचा व्याजदर 8.2 इतका झाला आहे.
आसाममध्ये आता शांतता ! केंद्र, राज्य सरकार व दहशत पसरविणाऱ्या उल्फामध्ये करार
केंद्र सरकारकडून इतर कोणत्याही योजनेतील व्याजदरात बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये वरिष्ठ नागरिक बचत योजनेत मागील वर्षी 8.2 व्याजदर ठेवण्यात आले होते, या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर मासिक आय बचत योजनेतही कोणताच बदल करण्यात आलेला नसून 7.4 व्याजदर आहे तेवढंच ठेवण्यात आलेलं आहे. तर राष्ट्रीय बचत पत्र 7.7 टक्के, भविष्य निर्वाह निधी (PPF) 7.1 किसान विकास पत्र 7.5 टक्के व्याजदर आहे तेवढेच ठेवण्यात आलं आहे.
समृद्धी सुकन्या योजनेत आधी 8 टक्के व्याजदर होता. आता हा दर 0.20 टक्क्याने वाढवून 8.2 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे आता सुकन्या समृद्धी लाभार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. सुकन्या समृद्धी योजनेसह तीन वर्षांच्या मुदत ठेव योजनेचा कालावधी 7.1 करण्यात आला आहे. मात्र, भविष्य निर्वाह निधी (PPF) च्या व्याजदरात केंद्र सरकारने काहीही बदल केलेला नाही.
‘इंडिया’ आघाडीच्या जागावाटपाचा ‘या’ दिवशी तिढा सुटणार? तारखेचा सस्पेन्स हटवला
कुटुंबात मुलगी झाली की, तिचं शिक्षण, उच्च शिक्षण लग्नाचा येणार अर्थिक भार, असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे ठाकतात. मुलीच्या खर्चाचा भार कुटुंबावर येऊ नये यासाठीच केंद्र सरकारकडून सुकन्या समृद्धी योजना सुरु करण्यात आली आहे. मोदी सरकारने या योजनेचा प्रारंभ केला होता. मुलीच्या जन्मापासून तिच्या पुढील 21 वर्षांनंतरचा विचार केला तर अनेक गोष्टींच्या दरात झपाट्याने वाढ होत असते. या परिस्थितीत सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलीच्या खर्चाला काहीशी मदत मिळत असल्याचं योजनेच्यामाध्यमातून सांगण्यात येत आहे. आता या योजनतील व्याजदरात वाढ झाल्याने नक्कीच लाभार्थ्यांना अर्थिक फायदा मिळणार आहे.
सुकन्या समृद्धी योजना म्हणजे काय?
केंद्र सरकारची एक लहान ठेव योजना असून ही योजना फक्त मुलींसाठीच लागू करण्यात आली आहे. ही योजना बेटी बचाव बेटी पढाओ अभियानांतर्गत 22 जानेवारी 2015 रोजीपासून सुरु करण्यात आली आहे. मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च कुटुंबावर एकदाच पडू नये, हा या योजनेचा उद्देश आहे. तुमच्या परिसरातील पोस्ट ऑफिसमधून या योजनेचं कामकाज पाहिलं जातं. या योजनेत खाते उघडण्यासाठी मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असावं लागतं. एका मुलीसाठी एकच खाते उघडणे बंधनकारक आहे. नियमानूसार एक कुटुंब फक्त दोनच सुकन्या समृद्धी योजनेचे खाते चालू करू शकतात. या खात्यामध्ये कमीत-कमी 250 रुपये आणि जास्तीत-जास्त 1 लाख 50 हजार रुपये प्रतिवर्षं भरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.