‘इंडिया’ आघाडीच्या जागावाटपाचा ‘या’ दिवशी तिढा सुटणार? तारखेचा सस्पेन्स हटवला

‘इंडिया’ आघाडीच्या जागावाटपाचा ‘या’ दिवशी तिढा सुटणार? तारखेचा सस्पेन्स हटवला

India Alliance : इंडिया आघाडीच्या (India Alliance) जागावाटपाचा तिढा सुटणार असल्याचं बोललं जात आहे. अनेक दिवसांपासून जागावाटपावर इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये चर्चा सुरु होती. अखेर या चर्चेनंतर नवी दिल्लीत होणाऱ्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जागावाटपाबाबत फॉर्मुला ठरवला जाणार आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे सर्व नेते या बैठकीला उपस्थित राहणार असून जागावाटपावर सविस्तर चर्चा करणार आहेत. यासंदर्भात माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.

‘दिल्लीच्या नेत्यांकडून फडणवीसांवर अन्याय अन् अपमान’; सुप्रिया सुळेंनी मराठी प्रेम दाखवलं

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची नवी दिल्लीत बैठक पार पडली. ही बैठक मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक महत्वाची मानली जात आहे. या महिनाच्या सुरुवातीलाच या काँग्रेसची समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी इतर राजकीय पक्षांसोबत युती करण्यासाठी चर्चा करण्यात आली आहे.

Ira Khan Wedding: होणार सून मी त्या घरची! आमिर खानची लेक इराचे जोरदार प्री-वेडिंग सेलिब्रेशन

मागील आठवड्यात शनिवारी या समितीची पहिली बैठक पार पडली. मुकुल वासनिक यांना या समितीचे समन्वयक करण्यात आलं आहे. ही समिती राज्य घटकांशी चर्चा करून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार आहे. निमंत्रक मुकुल वासनिक यांच्यासह राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, भूपेश बघेल, माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद आणि मोहन प्रकाश यांच्यासह दिग्गज नेत्यांना या समितीचे सदस्य बनवण्यात आलं असल्याचं मुकुल वासनिकांनी स्पष्ट केलं आहे.

सरकारचे मुंबई आणि टक्केवारीवरच लक्ष, रुग्णालयाचे उद्घाटन करा अन्यथा…; आव्हाडांचा आरोग्यमंत्र्यांना इशारा

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे इंडिया आघाडीचे काम जवळपास ठप्प झाले होते. याचे मुख्य कारण म्हणजे इंडियातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसचा निवडणुकांवर असलेला फोकस. त्यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे इंडिया आघाडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थानच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्याच्या दिवशी म्हणजे 6 डिसेंबरला काँग्रेसने बैठक बोलावली होती.

दरम्यान, सार्वत्रिक निवडणुकीसाठी आघाडीची रणनीती आणि जागावाटप ठरवण्यासाठी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा निवडणुकीच्या निकालांची प्रतीक्षा केली जात होती. आता निकाल हाती आले असून या बैठकीत जागावाटपावर चर्चा होऊ शकते. काँग्रेसला इंडिया आघाडीत बिग ब्रदरची भूमिका बजावायची आहे. त्यामुळे आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीनंतर इंडिया आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्मुला ठरणार असल्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube