‘दिल्लीच्या नेत्यांकडून फडणवीसांवर अन्याय अन् अपमान’; सुप्रिया सुळेंनी मराठी प्रेम दाखवलं
Supriya Sule On Devedra Fadnvis : दिल्लीच्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यावर अन्याय केला जात असून त्यांचा अपमान केला जातोयं, मराठी माणसाचा दिल्लीत अपमान होतो, याची अस्वस्थता वाटत असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी फडणवीसांसाठी मराठी प्रेम दाखवून दिलं आहे. पुण्यात आयोजित शेतकरी आक्रोश मोर्चादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी सुळेंनी देवेंद्र फडणवीसांवरही हल्लाबोल केला आहे.
Maratha Reservation : जरांगे पाटील मुंबईत येणारच, आम्हाला.. शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांचं विधान
सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजप फडणवीसांवर अन्याय करत असून दिल्लीतील नेत्यांकडून फडणवीसांचा अपमान केला जात आहे. राज्याचा एखादा नेता कष्ट करत असेल तर त्याचा मान सन्मान करायला नको का? एका मराठी माणसाचा अपमान दिल्लीचा दरबार करतो याची मला अस्वस्थता होत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
Manoj jarange : ‘पोलिसांनी वाहनं अडवली तर गृहमंत्र्यांच्या घरी जाऊन बसू’; जरांगेंचा रोखठोक इशारा
शेतकऱ्यांचे कंबरडे मोडायचे पाप :
केंद्रासर राज्य सरकार स्वार्थी आहे..त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं पाप केलं असून या सरकारला लोकशाही नाहीतर दडपशाही पाहिजे आहे. देशात आता लोकशाही राहिली नसून फक्त दडपशाही राहिली आहे. त्यामुळेच लोकांचा आवाज म्हणून आम्ही दिल्लीत बोलत आहोत. लोकांच्या वेदना सरकार दरबारी मांडल्या तर आमचं निलंबन केलं जात असल्याचंही सुळे म्हणाल्या आहेत. राज्यातील सरकार केवळ पक्ष फोडा, घर फोडा या कामात व्यस्त आहे. शेतकऱ्यांसाठी न्याय मागितला तर केंद्र सरकारकडून निलंबन केले जाते.
फडणवीसांवरही हल्लाबोल :
फडणवीस गृहमंत्री असताना राज्यात क्राईम का वाढत आहे. आधीही फडणवीस पाच वर्ष गृहमंत्री होते. भाजप हा महिलांच्या विरोधातील पक्ष असून महाविकास आघाडीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा आजचा तिसरा दिवस आहे. यावेळी सुप्रिया सुळे मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
दरम्यान, सध्या राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने युती करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एक पाऊल पुढं टाकलं आहे. यावेळी वंचितकडून महाविकास आघाडीतील चारही पक्षांनी 12 जागा लढवल्या पाहिजेत, अशी भूमिका मांडली आहे. त्यावरही सुळेंनी भाष्य केलं आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत आम्ही जागावाटपाच्या मुद्द्यावरुन चर्चा करणार आहोत. पुढील दहा दिवसांत महाविकास आघाडीच्या जागांबाबत माहिती तुम्हाला समजणार असल्याचंही सुळेंनी स्पष्ट केलं आहे.