Maratha Reservation : जरांगे पाटील मुंबईत येणारच, आम्हाला.. शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांचं विधान
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आता मराठा (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आरपारच्या भूमिकेत दिसत आहेत. काल त्यांनी मुंबईकडे जाण्यासाठी कोणता मार्ग असेल याची माहिती दिली. एकदा मुंबईत पोहोचलो की आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आंदोलनाच्या नियोजनाची जबाबदारी मुंबईत असणाऱ्या शिष्टमंडळाकडे आहे. त्यांनी आझाद मैदानावर पाहणी दौरा सुरू केला. त्यानंतर या शिष्टमंडळातील दोघा जणांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत आगमन होणारच आहे. एकतर ते उपोषणासाठी असेल किंवा विजयी सभेत त्याचं रुपांतर तरी होईल. राज्य सरकारने आधी आरक्षण दिलं तर विजयी सभेत रुपांतर होईल, असे सांगण्यात आले.
मनोज जरांगे पाटील हे 20 जानेवारीला आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे निघणार आहेत. मुंबईतील उपोषणाच्या पूर्वतयारीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या होणाऱ्या सभेसाठी तीन मैदान निवडण्यात आली आहेत. या मैदानांची शिष्टमंडळ पाहणी करणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शिष्टमंडळातील एका पदाधिकाऱ्याने दिली.
Manoj Jarange : मराठा आरक्षण मार्गी लागल्यानंतर राजकारणात येणार का? जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
आधी आम्ही आझाद मैदान ची पाहणी करणार आहोत. त्यानंतर इतर मैदानांची पाहणी होईल. आझाद मैदान पाहून झाल्यानंचर जर गरज वाटली तर आणखी मैदानांची पाहणी करू. राज्यातून किती मराठे किती येणार याचा अंदाज कुणाही लावू नये. आम्ही 58 व्या मोर्चात जे केले त्याचा डेटा आमच्याकडे आहे. त्याचा वापर करून नियोजन करणार आहोत. यामध्ये आम्हाला कोणतीही समस्या येणार नाही. लाखो लोकांचे 58 मोर्चे आम्ही सांभाळले आहेत, असंही ते म्हणाले.
मैदानांची पाहणी करून झाल्यानंतर मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून मैदान जाहीर करण्यात येईल. आंदोलनाचं नियोजन, परवानगीसाठी टीम तयार करण्यात येऊन यातील प्रत्येकाला कामे वाटून देण्यात येतील, असे मुंबईतील मराठा आंदोलनाचे काम पाहणारे विरेंद्र पवार म्हणाले.
Maratha Reservation : जरांगे पाटलांना उपोषणाची गरज पडणार नाही; गिरीश महाजनांचे सूचक वक्तव्य