लेट्सअप स्पेशल : सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजितदादांच्या मनात कोण? : सुनेत्रा पवार नक्कीच नाही

  • Written By: Published:
लेट्सअप स्पेशल : सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजितदादांच्या मनात कोण? : सुनेत्रा पवार नक्कीच नाही

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीसह राष्ट्रवादीच्या ताब्यातील चार लोकसभा मतदारसंघाची निवडणूक महायुतीतून लढविण्याची घोषणा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना -भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यातील लोकसभा जागावाटपाची चर्चा सुरू होण्याआधीच अजितदादांनी आपले नियोजन जाहीर केले आहे. तसेच शिवसेनेच्या उबाठा गटाकडे असलेल्या मतदारसंघातील काही जागा मिळविणार असल्याची घोषणा त्यांनी राष्ट्रवादीच्या कर्जत येथील विचारमंथन बैठकीत केली. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविणार असल्याची त्यांची घोषणा ही खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. अनेकांना असे वाटत होते की, सुळे यांच्याविरोधात अजितदादा उमेदवार उभे करणार नाहीत. मात्र  त्यांच्या घोषणेनंतर अजितदादा हे बारामतीबाबत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. आता सुळे यांच्याविरोधात अजितदादा कोण उमेदवार देणार, याची उत्सुकता आहे. (Who is the candidate For Baramati 2024 Election )

Sharad Pawar : ईडीने किती मजले ताब्यात घेतले?; पटेलांच्या पुस्तकासाठी पवारांनी सुचवला ‘चॅप्टर’

अनेक माध्यमांनी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले आहे. अजितदादांनी मात्र आपण यावर योग्य तो निर्णय योग्यवेळी जाहीर करू असे सांगत यातील औत्सुक्य कायम ठेवले आहे. तर, सुप्रिया यांच्याविरोधात अजितदादांच्या मनातील संभाव्य उमेदवार कोण असेल आणि ज्यांची सध्या चर्चा सुरू आहे, त्या सुनेत्रा पवार खरंच निवडणुकीच्या रिंगणात उतरतील का? आणि त्या नसतील तर, इतर कोणती नावे पुढे येतील, याबाबतचे विश्लेषण पुढीलप्रमाणे…

सुनेत्रा पवार

बारामती शहर आणि तालुक्यात सुनेत्रा पवार या नावाला वलय आहे. अजितदादांच्या अनुपस्थितीत सुनेत्रा पवार या अनेकांच्या आधार बनल्या आहेत. बारामती टेक्सटाईल पार्क, बारामती पर्यावरण चळवळ, काटेवाडी ग्रामस्वच्छता अभियान, विद्या प्रतिष्ठान अशा विविध संस्थांच्या माध्यमातून यामार्फत त्या नागरिकांशी संपर्कात असतात. महिलांमध्ये त्यांचे स्वतःचे असे नेटवर्क आहे. त्यामुळे साहजिकच त्यांचे नाव माध्यमांत सर्वाधिक आघाडीवर आहे. पण थेट सुळे यांच्या विरोधात अजित पवार हे कुटुंबातील उमेदवार त्यातही पत्नीला उमेदवारी देतील, याची शक्यता कमी आहे.

अजितदादांच्या बोलण्यात सत्यता नाही; काऊंटर फायर करत पवारांनी फेटाळले सर्व दावे

शरद पवार यांच्याविरोधात त्यांनी राजकीय भूमिका घेतली असली तरी हा वाद कौटुंबिक नात्यात येण्याची शक्यता कमी दिसते. त्यातही सुनेत्रा यांना उमेदवारी दिली तर पार्थ यांच्या राजकीय भवितव्याचे काय, असाही प्रश्न उपस्थित होतो. एकाच वेळी पत्नीला बारामतीतून आणि पुत्र पार्थ यांना मावळ किंवा इतर कोणत्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देणे अजित पवार यांना राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही.  त्यामुळे सुनेत्रा यांचे नाव माध्यमांनी लावून धरले असले तरी, त्या निवडणुकीच्या रिंगणात येण्याची शक्यता कमी आहे. आल्या तरी थेट सुप्रिया यांच्याविरोधात त्या निवडणूक लढवतीलच याची शक्यता त्याहून कमी आहे.

B L Killarikar : राजीनाम्यानंतर किल्लारीकरांनी घेतली पवारांची भेट; सांगितली विरोधकांची नावं

पार्थ पवार

पुत्र पार्थ यांचे राजकीय लाॅचिंग २०१९ मध्ये मावळमध्ये फसले. त्यांना स्वतःला राजकारणात येण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी आपला संभाव्य मतदारसंघ कोणता, याविषयी कोणतीही चुणूक लागू दिलेली नाही. ते कोणत्याही मतदारसंघातून सक्रिय नाहीत. त्यामुळे घरचा मतदारसंघ असलेल्या बारामतीतून ते निवडणूक लढवतील, असेही अनेकांना वाटते. पण आधी म्हटल्याप्रमाणे सुळे यांच्या विरोधात आपल्याच कुटुंबातील कोणी व्यक्ती देण्याचा निर्णय अजितदादा घेतील, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. त्यामुळे पार्थ हे आपल्या आत्याच्या विरोधात निवडणूक लढविण्याची शक्यता कमी आहे.

बारामतीत होणार पवार विरूद्ध पवार लढत?

अजित पवारांनी 2024 मध्ये बारामतीच्या नावाची घोषणा केली आहे. याबाबत शरद पवारांना पुण्यात पत्रकार परिषेदत बारामतीत पवार विरूद्ध पवार अशी लढत होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी पवार विरूद्ध पवार असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. त्यामुळे पार्थ आणि सुनेत्रा पवार यांचा नावांचा विचार अजितदादा करतील अशी शक्यता यामुळे धूसर झाली आहे.

Jayant Patil : मुख्यमंत्रिपद जाणार म्हणून शिंदेंचं कुणी ऐकत नाही; जयंत पाटलांनी सांगितली ‘अंदर की बात’

कांचन कुल

दौंड भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणूक सुळे यांच्याविरोधात भाजपकडून लढविली होती. त्यामुळे त्यांचेही नाव २०२४ च्या निवडणुकीसाठी पुन्हा चर्चेत आले आहे. अजितदादा हे त्यांना उमेदवारी देतील, अशीही शक्यता बोलून दाखविण्यात येत आहे. पण भाजप आमदाराच्या पत्नीला राष्ट्रवादीचे तिकीट देण्याचा निर्णय अजितदादा घेतील, असे वाटत नाही. राहुल कुल यांचे  दौंडमधील विरोधक रमेश थोरात हे अजितदादांच्या जवळचे आहेत. थोरात यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा अजितदादांचा प्रयत्न आहे. कुल हे एकेकाळी अजित पवार यांच्या अतिशय जवळ होते. मात्र ते आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे कुल यांच्या पत्नीला राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याची शक्यताही धूसर आहे.

दत्तात्रय भरणे

सुळे (पवार) विरुद्ध पवार असा सामना टाळायचा असेल तर, कुटुंबाबाहेरील व्यक्ती देण्याचा निर्णय अजित पवार घेतील. त्यात माजी राज्यमंत्री आणि इंदापूरचे आमदार दत्ता भरणे हे डार्क हाॅर्स ठरू शकतात. अजित पवार यांच्याकडे धनगर चेहरा नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची संख्याही लक्षणीय आहे. त्यात भरणे यांना लोकसभेची उमेदवारी दिली तर, त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीला उपयोग होऊ शकतो. भरणे हे समजा लोकसभेत पराभूत झाले तरी, इंदापूर विधानसभेसाठी त्यांची उमेदवारी कायमच राहणार आहे. त्यामुळे बारामतीची निवडणूक गंभीरतेने लढण्याचा उद्देशही साध्य होईल आणि पवार कुटुंबातील संघर्ष टाळणे देखील शक्य होणार आहे.

लोकसभेपूर्वी येणार दोन महत्त्वाचे कायदे; अजितदादांनी दिले सूतोवाच

रूपाली चाकणकर

बारामीत लोकसभा मतदारसंघासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या सध्या प्रभावी वक्त्या म्हणून अजितदादांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये पुढे आलेल्या आहेत. त्यांची लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आहेच. त्यातही सुळेंच्या विरोधात पवार कुटुंबाच्या व्यतिरिक्त जर उमेदवार द्यायचे ठरले तर, चाकणकर यांचे नाव आघाडीवर राहू शकते. त्यांना भाजप, शिवसेना आणि अजित पवार गट अशी तीनही पक्षांची ताकद मिळू शकते. या लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मतदारसंख्या ही खडकवासला विधानसभा मतदारसंघात आहे. चाकणकर या तेथून येतात. सुळे यांना पराभूत करायचे असेल तर, खडकवासल्यातून कमाल मताधिक्य मिळणे अजितदादांसाठी महत्वाचे ठरू शकते. त्यामुळेच चाकणकर यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

मोदी, राहुल गांधींनाही OBC समाजाचं महत्त्व पटलं; अजितदादांनासमोर भुजबळांनी ठासून मांडला मुद्दा

बारामती विधानसभा मतदारसंघातून सुळे यांना एक लाखाचे मताधिक्य आतापर्यंत मिळाले आहे. त्याच बळावर त्या निवडणूक सहज जिंकतात. मात्र अजित पवार विरोधात असतील तर, सुळे यांना अधिक काळजी घ्यावी लागेल. बारामतीकर मोठ्या साहेबांकडे कल दाखविणार की अजित पवार यांच्या उमेदवाराला लोकसभेसाठी संधी देणार, हा मोठा औत्सुक्याचा विषय असणार आहे. सहावी शक्यता म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेद लोकसभा निवडणुकीपर्य़ंत संपलेले असतील. पण ही शक्यता फारच कमी आहे. पण बारामतीपुरते तरी ते पडद्यामागे तडजोड करतील, हे नाकारता येत नाही. त्यामुळे वर चर्चा केलेल्या नावांपेक्षा आणखी नवेच नाव अजितदादांच्या मनात असू शकते की ज्याद्वारे निवडणूक लढविल्यासारखे दाखवता येईल आणि सुळे यांचा विजयही सुकर होईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube