लोकसभेपूर्वी येणार दोन महत्त्वाचे कायदे; अजितदादांनी दिले सूतोवाच
Ajit Pawar On Population Control Bill & UCC : आगामी लोकसभेपूर्वी देशात काही नवीन कायदे येण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यातील समान नागरी कायद्याबाबत (Uniform Civil Code) देशातील प्रमुख विरोधीपक्षांनी जोरदार विरोध केला आहे. मात्र, त्यानंतरही हा कायदा आणण्यासाठी मोदी सरकार आग्रही असून, आगामी लोकसभेपूर्वी देशात दोन महत्त्वाचे कायदे येणार आहेत, असे सूतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते कर्जत येथे आयोजित राष्ट्रवादीच्या वैचारिक मंथन शिबिरात बोलत होते.
Ajit Pawar : ‘भाजपनं नाकारलं म्हणून अनिल देशमुखांनी साथ सोडली’; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
अजित पवार म्हणाले की, देशात सर्वाधिक तरूण भारतात आहेत. परंतु, साधारण एक वीसएक वर्षांनी भारताची लोकसंख्या 160 कोटींच्या घरात जाईल, त्यात काही हायगन नाही. परंतु, त्यावेळी सगळ्यात जास्त जेष्ठ असणारा देश भारत झालेला असेल. समान नागरी कायदा जनतेला समजून सांगा, यामुळे कोणाचेही आरक्षण जाणार नाही हे जनतेपर्यंत पोहचावा अशा सूचनाही यावेळी अजितदादांनी केल्या.
लोकसंख्या नियंत्रणासाठी मोदींनी कायदा आणावा
आम्ही काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही. जनतेचं प्रेम, पाठिंबा हे असेपर्यंत आम्ही सत्तेत आहोत याची सर्वांना कल्पना आहे. पण, येणाऱ्या पिढीसाठी आताच विचार करण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी आताच काहीही करून एक किंवा दोन अपत्यांवरच थांबणं गरजेचे झालेले आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी नरेंद्र मोदींनी कायदा करावा लागला तरी तो करून अमलात आणावा असेही यावेळी अजितदादांनी सुचवले.
Ajit Pawar : मी आठवण करून दिली, पण जयंतराव एकवर्ष करत करत तिथेच; भुजबळांनंतर अजितदादांचाही टोला
…तर परिस्थिती भीषण असेल
कोणत्याही जातीनं, धर्मानं, देवानं, अल्लानं किंवा पथानं कितीही मुलं जन्माला घाला असे सांगितलेले नाही. त्यामुळे आताच एक किंवा दोन अपत्यांवर नाही थांबलो तर, काही वर्षांनी या देशात पाणी, घरांसह अन्य मुलभूत गोष्टींची पूर्तता करता येणार नाही अशी भयानक परस्थिती निर्माण होईल अशी भीती अजितदादांनी व्यक्त केली.
समान नागरी कायद्याबाबत गैरसमज
लोकसंख्या नियंत्रणात यावी यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी कायदा आणावा अशी विनंती करताना अजितदादांनी समान नागरी कायद्याबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, या कायद्याबाबत आदीवासी, मागासवर्गीय समाजासह अनेक समाजातील लोकांमध्ये गैरसमज आहेत. या कायद्यामुळे कोणत्याहीप्रकारच्या आरक्षणाला अजिबात धोका नसल्याचे अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केले.
Ajit Pawar : बारामती लढणारच! अजितदादांच्या निर्धारानं वाढलं सुप्रिया सुळेंचं टेन्शन
समान नागरी कायदा म्हणजे काय?
समान नागरी कायद्यामुळे कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही हे अधोरेखित करत अजितदादांनी नेमका हा कायद काय आहे हे समजावून सांगितले. ते म्हणाले की, समान नागरी कायदा म्हणजे या देशात जन्माला आलेल्या प्रत्येकाला कायदा सारखा. यात आरक्षण वेगळ. तुमचं आरक्षण राहणारचं ते कुणीही काढून घेऊ मग ती कुणीही राज्यकर्ते असले आणि कशीही परिस्थीती निर्माण झाली तरी तुमचं आरक्षण कुणीही काढून घेऊ शकत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी वेगळं सांगितलं होते. त्यानंतर अनेक सरकारं आली. मात्र, आरक्षण राहिलं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी समान नागरी कायद्याबद्दल विचार करणे गरजेचे असून, याबाबत सर्व राजकीय पक्षांना भूमिका घ्यावी लागणार आहे. यात काही शंका, कुशंका त्रृटी असतील तर त्यावर चर्चा करू कारण चर्चेतून नेहमी काहीतरी चांगलं बाहेर येतं असा विश्वास यावेळी अजितदादांनी व्यक्त केला.
पुढच्या पिढीचं काय भवितव्य आहे याचा विचार आताच्याच राजकर्त्यांनी करणे गरजेचे आहे. येणाऱ्या भविष्यातील पिढिनं मागच्यांनी हे काय करून ठेवलं हे म्हणण्याची वेळ येऊ देऊ नये असा सल्लादेखील पवारांनी राजकारण्यांना लगावला. कायदा आणताना वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात असेही ते म्हणाले.
मोदी, राहुल गांधींनाही OBC समाजाचं महत्त्व पटलं; अजितदादांनासमोर भुजबळांनी ठासून मांडला मुद्दा
संजय गांधींचा दिला दाखला
यावेळी 75 साली ज्यावेळी आणिबाणी लागली होती. त्यावेळी संजय गांधींनी पाच कलमी कार्यक्रम आणला होता. मात्र, त्यावेळी हा कार्यक्रम व्यवस्थित राबवला गेला नाही. त्याचा अतिरेक झाला आणि त्याची किंमत 77 साली इंदिरा गांधींना मोजावी लागल्याचा दाखल अजितदादांनी यावेळी दिला. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होऊ द्यायच नाही असे अजित पवार म्हणाले.
दोन्ही मुद्दे केवळ चर्चेसाठी
कर्जत येथील कार्यक्रमात लोकसंख्या नियंत्रण आणि समान नागरी कायद्याबाबत जीवतोडून बोललल्यानंतर हे दोन्ही कायदे अस्तित्त्वात खरचं येणार का? असा प्रश्न अजितदादांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर हे दोन्ही मुद्दे आपण केवळ चर्चेसाठी सुचवले असून, ते अस्तित्त्वात येतील की नाही हे माहीती नाही, असे अजितदादांनी यावेळी स्पष्ट केले.