Download App

मुंबई मेट्रो रेल्वेमध्ये नोकरीची संधी, महिन्याला दोन लाख रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?

  • Written By: Last Updated:

MMRCL Bharti 2024: भारतीय रेल्वे (Indian Railways) ही जगातील चौथी मोठी रेल्वे सेवा आहे. भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे विभागाच्या देखरेखीसाठी रेल्वे विभागाला मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करते. जर तुम्हाला मुंबई मेट्रो रेल्वमध्ये (Mumbai Metro Rail) नोकरी करण्याची (Job) इच्छा असेल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया  सुरू केली आहे.

दादांचा शिलेदार लंकेंची शरद पवार गटाच्या मेळाव्याला उपस्थिती, राजकीय चर्चांना उधाण 

पदाचे नाव –
सहाय्यक महाव्यवस्थापक (सुरक्षा) -01
सहाय्यक महाव्यवस्थापक (RS) -01
सहाय्यक व्यवस्थापक (PR) -01
असिस्टंट मॅनेजर (फायर) -01
उपअभियंता (सुरक्षा) -01
कनिष्ठ अभियंता-II (E&M) -01
अग्निशामक निरीक्षक -01
कनिष्ठ अभियंता – II (स्थापत्य) 01
वरिष्ठ सहाय्यक (HR) -01

शैक्षणिक पात्रता –
या पदांसाठी पात्र उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. त्याबद्दल जाणून घेण्यासाठी अधिसूचना वाचावी.

वयोमर्यादा-
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवारांची वयोमर्यादा ४० वर्षे आहे.

Amruta Khanvilkar: चंद्रमुखीचं मनमोहक रूप; सोशल मीडियावर फोटो व्हायरल! 

नोकरीचे ठिकाण –
नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.

वेतनश्रेणी –
सहाय्यक महाव्यवस्थापक (सुरक्षा) – रु. 70,000 – रु. 2,00,000/-
सहाय्यक महाव्यवस्थापक (RS) – रु. 70,000 – रु. 2,00,000/-
सहाय्यक व्यवस्थापक (PR) – रु. 50,000- 1,60,000/-
सहाय्यक व्यवस्थापक (फायरमन) – रु. 50,000- 1,60,000/-
उपअभियंता (सुरक्षा) – रु. 50,000- 1,60,000/-
कनिष्ठ अभियंता-II (E&M) – रु.35,280 ते रु.67,920/-
अग्निशमन निरीक्षक – रु. 35,280 ते रु. 67,920/-
कनिष्ठ अभियंता – II (स्थापत्य) – रु. 35,280 ते रु. 67,920/-
वरिष्ठ सहाय्यक (एचआर) – रु.34,020 ते रु.64,310/-

अर्ज प्रक्रिया – तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची अंतिम तारीख – १५ एप्रिल २०२४

अधिकृत वेबसाइट –
अधिक तपशीलवार माहितीसाठी अधिकृत वेबसाइट http://www.mmrcl.com वर क्लिक करा.

अधिसूचना –
https://mmrcl.com/sites/default/files/Revised%20Recruitment%20Advertisement%202024%20-01.pd

अर्ज कसा करायचा?
अर्ज ऑनलाइन करावा लागेल. अर्ज करण्यापूर्वी उमदेवरांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा. कारण, अर्ज करतांना अर्जात अपुरी आणि चुकीची माहिती भरल्यास अर्ज नाकारल्या जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

follow us