Nabard Job 2025 : आज अनेकजण सरकारी नोकरीच्या (Govt job)शोधात आहेत. मात्र, या स्पर्धेच्या काळात सरकारी नोकरी मिळवणं हे मोठं आव्हान आहे. दरम्यान, सरकारी नोकरीच्या (Sarkari Nokari) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नाबार्डमध्ये (Nabard Job 2025) नोकरीची संधी चालून आली. नाबार्डमध्ये ६ स्पेशालिस्ट ऑफिसर पदे भरली जाणार आहे. नाबार्डने या भरती प्रक्रियेबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट http://www.nabard.org ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १६ मे २०२५ पासून सुरू झाली आहे.
रिक्त पदांचा तपशील
नाबार्ड स्पेशालिस्ट ऑफिसर भरती २०२५ मध्ये तीन प्रमुख पदांसाठी एकूण ६ रिक्त जागा उपलब्ध आहेत. यामध्ये In Charge–Survey Cell – १ पद, Senior Statistical Analyst – १ पद आणि Statistical Analyst – ४ पदांचा समावेश आहे. ही सगळी पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एमए/एमएससी पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच किमान १ ते कमाल १० वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. पण, शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहावी.
वयोमर्यादा
In Charge–Survey Cell पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३८ ते ५५ वर्षांच्या दरम्यान असावे. Senior Statistical Analyst पदासाठी वयोमर्यादा ३० ते ४५ वर्षे आहे. तर Statistical Analyst पदासाठी उमेदवाराचे वय २४ ते ३० वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरूवात – १६ मे २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख – १ जून २०२५ पर्यंत
नोकरीचे ठिकाण
या भरती प्रक्रियेत निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती नाबार्डच्या मुंबईतील मुख्यालयात केली जाईल. त्यामुळे, मुंबईत राहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
चीनचा रडीचा डाव! व्यापारात भारताला खराब वस्तूंचा पुरवठा; भारतानेही घेतला ‘हा’ निर्णय
अर्ज शुल्क
अर्ज भरण्यासोबतच उमेदवारांना अर्ज शुल्क देखील भरावे लागेल. एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना १५० रुपये शुल्क भरावे लागेल, तर सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क भरावे लागेल.
निवड प्रक्रिया
नाबार्डमधील या रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीद्वारे केली जाईल. कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.
पगार
नाबार्ड स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरघोस पगार दिला जाणार आहे. यामध्ये, In Charge–Survey Cell पदासाठी दरमहा ३ लाख रुपये, Senior Statistical Analyst पदासाठी दरमहा २ लाख रुपये आणि Statistical Analyst पदासाठी दरमहा १.२५ लाख रुपये वेतन मिळेल.
दरम्यान, या पदभरतीसाठी अर्ज करायला आता अवघेच काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे उमेदवारांनी वेळ न दवडता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत.
महत्वाचं असं की, अर्ज भरतांना भरतांनी आधी अधिसुचना वाचावी. त्यानंतरच अर्ज करावा. कारण, अर्जात काही चुका राहिल्यास अर्ज नाकारल्या जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.