Download App

NARI मध्ये नोकरीची संधी, महिन्याला 64 हजार रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?

  • Written By: Last Updated:

NARI Pune Bharti 2023: आज प्रत्येकाला सरकारी नोकरी (Govt job) हवी असते. मात्र, आजच्या या प्रचंड स्पर्धेच्या काळात शासकीय नोकरी मिळणं हे फारच कठीण झालं आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही. यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. तुम्हीही सरकारी नोकरी शोधत असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, ICMR अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अंतर्गत येणारी ‘NARI’ म्हणजेच राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

Sanjay Shirsath : स्वाभिमान गाडला गेला, आता लोकांची पालखी वाहावी; शिंदेंच्या आमदाराचा ठाकरेंना टोला 

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेअंतर्गत ‘प्रकल्प तंत्रज्ञ-III, संशोधन अधिकारी (फील्ड), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, संशोधन सहाय्यक’ पदांसाठी एकूण 6 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी भरती जाहीर करण्यात आली असून पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 आणि 7 डिसेंबर 2023 आहे. चला तर मग या भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.

शिक्षण खात्यातील काळा दिवस! तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्याकडे 5.85 कोटींचं घबाड; गुन्हा दाखल 

पदाचे नाव – प्रकल्प तंत्रज्ञ, संशोधन अधिकारी (फिल्ड), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, संशोधन सहाय्यक

एकूण पदांची संख्या – 6

शैक्षणिक पात्रता –
तंत्रज्ञ III – 12वी पास.

संशोधन अधिकारी (क्षेत्र): जीवन विज्ञान आणि आरोग्य विज्ञान मध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ: विज्ञान विषयात 12वी पास आणि वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ या विषयात दोन वर्षांचा डिप्लोमा.

संशोधन सहाय्यक: मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान/समाजशास्त्र/सामाजिक कार्य/मानवशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/आरोग्य विज्ञान या विषयातील पदवीधर आणि मान्यताप्राप्त संस्थेतून तीन वर्षांचा कामाचा अनुभव.

नोकरीचे ठिकाण – पुणे

वय श्रेणी –
प्रकल्प तंत्रज्ञ, संशोधन अधिकारी (फिल्ड), प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 30 वर्षे
संशोधन अधिकारी (फील्ड) – 35 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची ताऱीख – 6 आणि 7 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ

https://www.nari-icmr.res.in/

पगार –
प्रकल्प तंत्रज्ञ-III – रु. 20 हजार + HRA
संशोधन अधिकारी (फील्ड) – 64 हजार रुपये.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. 18 हजार.
संशोधन सहाय्यक- 31 हजार रुपये.

जाहिरात-
https://www.nari-icmr.res.in/Nari/Career

अर्ज प्रक्रिया: या पदासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी लिंकवर दिलेली सूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याच्या तपशीलवार सूचना www.nari-icmr.res.in वर उपलब्ध आहेत. त. शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच 7 डिसेंबरपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

Tags

follow us