Download App

भारतात ‘या’ प्राण्यांचं अस्तित्वच धोक्यात; जाणून घ्या, राष्ट्रीय वन्यजीव दिनाचा इतिहास…

दरवर्षी 4 सप्टेंबर आणि 22 फेब्रुवारी या दोन दिवशी राष्ट्रीय वन्यजीव दिवस (National Wildlife Day) साजरा केला जातो.

National Wildlife Day 2024 : दरवर्षी 4 सप्टेंबर आणि 22 फेब्रुवारी या दोन दिवशी राष्ट्रीय वन्यजीव दिवस (National Wildlife Day) साजरा केला जातो. वेगाने नामशेष होणाऱ्या वन्य प्राण्यांच्या प्रजाती आणि त्यांच्या अधिवासाबाबत नागरिकांत जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मार्च महिन्यात जागतिक वन्यजीव दिवस (World Wildlife Day) साजरा केला जातो. परंतु राष्ट्रीय वन्यजीव दिवस आणि जागतिक वन्यजीव दिवस यांमध्ये मूलभूत फरक आहे.

वन्यजीव दिवसाचा इतिहास

सन 2005 मध्ये कोलीन पॅगे यांनी राष्ट्रीय वन्यजीव दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. पृथ्वीवरील वन्यप्राण्यांना जाणवत असलेल्या समस्यांबाबत जनजागृती करणे हा त्यांचा उद्देश होता. पुढे सप्टेंबर 2006 मध्ये जगाने वन्यजीव तज्ज्ञ स्टीव्ह इरविन यांना गमावले. त्यामुळे स्टीव्ह इरविन यांनी या क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा सन्मानार्थ राष्ट्रीय वन्यजीव दिवस समर्पित करण्यात आले. त्यानंतर 22 फेब्रुवारी इरविन यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय वन्यजीव दिवस साजरा करण्यात येऊ लागला.

आज प्राण्यांच्या प्रजाती वेगाने नामशेष होत चालल्या आहेत यामध्ये सर्वात मोठा वाटा मानवी हस्तक्षेपाचा आहे. त्यामुळे हा हस्तक्षेप रोखण्यासाठी काय करता येईल याची माहिती सर्वसामान्य लोकांना देण्याची गरज आहे. अनेक प्राणी असहाय आहेत आणि जिवंत राहण्यासाठी माणसांवर अवलंबून आहेत. त्यामुळे आपण याबाबत अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.

वन्यजीवप्रेमींसाठी गुड न्यूज! बारामतीत सुरू होणार वन्यजीव सफारी, वन विभागाचा मोठा निर्णय

भारतात ‘या’ प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात भारतातून नामशेष होण्याचा धोका असलेल्या काही प्राण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये आशियाई हत्ती, गंगा नदी डॉल्फिन, एकशिंगी गेंडा, बंगाल टायगर, हिम बिबट्या, अस्वल, आशियाई सिंह, भारतीय बायसन, निलगिरी तहर (जंगलातील शेळ्यांची एक प्रजाती) आणि लायन टेल्ड मकाक या प्राण्यांचा समावेश आहे. या प्राण्यांचे संवर्धन करून त्यांचे अस्तित्व जपण्यासाठी आता वेगाने कार्यवाही करण्याची गरज आहे.

वन्यजीव दिनी तुम्ही काय करू शकता

जर तुम्हाला वन्यजीव क्षेत्रात आवड आहे तर जवळच्या प्राणी संग्रहालयाशी संपर्क साधा. त्यांना जर स्वयंसेवकांची आवश्यकता असेल तर तुम्ही येथे मदत करू शकता.

वन्यप्राण्यांबाबत लोकांत जनजागृती करण्याच्या उद्देशाने तुम्ही एखाद्या प्राणी संग्रहालय किंवा या क्षेत्रात काम करणाऱ्या एखाद्या स्वयंसेवी संस्थेची मदत घेऊ शकता.

प्राण्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. तसेच प्राणी राहत असलेली ठिकाणे देखील स्वच्छ असणे महत्वाचे आहे. त्यामुळे अशा ठिकाणची स्वच्छता मोहिम तु्म्ही राबवू शकता.

स्वतःला शिक्षित करा. नामशेष होणाऱ्या प्रजाती, संरक्षण, ग्लोबल वॉर्मिंग यांसारख्या महत्वाच्या विषयांचा अभ्यास करू शकता. यांची माहिती घेऊन समस्या कमी करण्यासाठी उपाययोजनाही करू शकता.

बांधवगड राष्ट्रीय उद्यानच्या कर्मचाऱ्यांसाठी धावून आला ‘पुनीत बालन ग्रुप’, कोट्यवधींचे विमा कवच प्रदान

follow us