वन्यजीवप्रेमींसाठी गुड न्यूज! बारामतीत सुरू होणार वन्यजीव सफारी, वन विभागाचा मोठा निर्णय

  • Written By: Published:
वन्यजीवप्रेमींसाठी गुड न्यूज! बारामतीत सुरू होणार वन्यजीव सफारी, वन विभागाचा मोठा निर्णय

Wildlife Safari : वन्यजीव पाहण्यासाठी राज्यातील अभयारण्यात अनेक पर्यटक भेटी देऊन सफारीची आनंद लुटतात. गेल्या काही वर्षापाससून बारामतीत वन्यजीव सफारी (Wildlife Safari) सुरू करण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, आता वनविभागाने बारामती तालुक्यातील गाडीखेल गावात वन्यजीव सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं निसर्गप्रेमींना बिबट्यांसह पाच वेगवेगळ्या प्रजातींचे वन्यजीव पाहता येतील.

Pune News : पवार फॅमिली एकत्र? सुप्रिया सुळेंनी सांगितलं खरं कारण.., 

वनविभागाने नुकतीच वन्यजीव सफारीची रचना करण्यासाठी वास्तुविशारदाची नियुक्ती केली असून, पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्रत्यक्ष काम सुरू होण्याची अपेक्षा आहे, असे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

गडीखेल या गावातील सुमारे 250 हेक्टर वनक्षेत्रावर वन्य जीव सफारी करण्यात येणार आहे. त्यासाठी 2022-23 च्या अर्थसंकल्पात सुमारे 60 कोटी रुपयांची तरतूद केली होती. आता प्रत्यक्ष याची सुरूवात होणार आहे. या वन्यजीव सफारीमुळं परिसरातील स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. हा वन्यजीव सफारी सुरू करण्याचा वनविभागाचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे, कारण या प्रकल्पाबाबत बराच वाद निर्माण झाला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बहुप्रतिक्षित बिबट्या सफारी सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा त्याला जुन्नरच्या शिवसेनेच्या आमदारांनी विरोध केला होता. जुन्नरमध्ये वन्यजीव सफारी व्हावी, असं जुन्नरकच्या लोकप्रतिनिधींच मत होतं. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत जुन्नर तालुक्यातच बिबट्या सफारी सुरू केली जाईल, असे जाहीर केले. तेव्हापासून बारामती सफारी प्रकल्पाचा निर्णय प्रलंबित होता. मात्र, आता बारामतीत वन्यजीव सफारी सुरू करण्याला वन विभागाने मंजुरी दिली आहे.

‘अभ्यास करुन मराठ्यांच्या पोरांच्या बरगड्या मोडल्या’; जरांगेंनी वडेट्टीवारांना सांगितली सत्य परिस्थिती 

वन्यजीव सफारीच्या सद्यस्थितीबद्दल, वन उपसंरक्षक महादेव मोहिते म्हणाले, अलीकडेच, वन विभागाने वन्यजीव सफारीच्या अंमलबजावणीचा आराखडा तयार करण्यासाठी आर्किटेक्टची नियुक्ती केली आहे. नागपुरातील गोरेवाडा वन्यजीव सफारीसाठी डीपीआर तयार करणारे वास्तुविशारद अशफाक अहमद यांचीही बारामतीतील वन्यजीव सफारी प्रकल्पासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. योजना अंतिम करणे, निधीचे वाटप आणि इतर कामांना किमान तीन ते चार महिने लागतील आणि प्रत्यक्ष काम मार्च किंवा एप्रिलमध्ये सुरू होईल, असं ते म्हणाले.

पर्यटकांना पाहण्यासाटी ठेवण्यात आलेले प्राणी राज्याच्या इतर भागातून स्थलांतरित केले जातील. या सफारीसाठी प्रामुख्याने गवताळ प्रदेशातील परिसंस्थेला अनुकूल असलेल्या प्राण्यांचा विचार केला जाईल. सफारीसाठी आतापर्यंत वन्यजीवांच्या तीन प्रजाती निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये बिबट्या, हायना, लांडगे आणि देशी पक्ष्यांच्या प्रजाती यांसारख्या मांजर आणि कुत्र्यांच्या कुटुंबातील प्राण्यांचा समावेश आहे. इतर दोन श्रेणी अद्याप अंतिम होणे बाकी आहे, असं मोहिते म्हणाले.

सफारीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या वन्यजीवांच्या पाच प्रजातींमध्ये वाघांचा समावेश करण्याबाबत चर्चा झाली आहे.

वन्यजीव सफारीचे तपशील
एकूण क्षेत्र – 250 ते 300 हेक्टर
प्रदर्शनातील वन्यजीव प्रजातींची संख्या – पाच
कुत्रा आणि मांजर कुटुंबातील प्रजाती आणि देशी पक्ष्यांच्या प्रजातींचा समावेश आहे

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube