Netweb Technologies India : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळतेय. या घसरणीमुळे अनेक गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला असून आतापर्यंत भारतीय शेअर बाजारात लाखो रुपये बुडाले आहेत. तर दुसरीकडे एका शेअरने गुंतवणूकदारांना गेल्या तीन वर्षात 600 % पेक्षा जास्त नफा दिला आहे. होय, गेल्या पाच दिवसांत या शेअर्समध्ये 22 % वाढ झालीय. जर तुम्ही देखील शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर या शेअरबाबात जाणून घ्या.
या शेअर्सच नाव आहे नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया (Netweb Technologies India) . शुक्रवारी बीएसईवर (BSE) नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडियाचे शेअर्स 6% पेक्षा जास्त वाढून 3,750.05 वर पोहोचले तर गेल्या पाच दिवसात या शेअरच्या किंमतीमध्ये 22 % वाढ झालीय आणि गेल्या सहा महिन्यांत नेटवेब टेक्नॉलॉजीजचे शेअर्स 80% पेक्षा जास्त वाढले आहेत. नेटवेब टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत 600 % पेक्षा जास्त वाढ झालीय. नेटवेब टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 4,480 आहे, तर 52 आठवड्यांचा नीचांक 1,278.85 आहे.
IPO मध्ये शेअरची किंमत 500 आता पोहचली 3,700 वर
भारतीय शेअर बाजारात जेव्हा या कंपनीच्या आयपीओने एन्ट्री घेतली होती तेव्हा या कंपनीच्या एका शेअरची किंमत 500 होती. कंपनीचा आयपीओ 17 जुलै 2023 रोजी बोलीसाठी उघडला होता आणि 19 जुलैपर्यंत खुला राहिला. 27 जुलै 2023 रोजी नेटवेब टेक्नॉलॉजीजचे शेअर्स बीएसईवर 942.50 वर लिस्टिंग झाले आणि लिस्टिंगच्या दिवशी 910.50 वर बंद झाले. 20 फेब्रुवारी 2026 रोजी नेटवेब टेक्नॉलॉजीजचे शेअर्स 3750.05 वर पोहोचले. 500 च्या इश्यू किमतीच्या तुलनेत, नेटवेब टेक्नॉलॉजीजचे शेअर्स तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत 600% पेक्षा जास्त वाढले आहेत.
एका वर्षात 130% पेक्षा जास्त वाढ
गेल्या एका वर्षात नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडियाचे शेअर्स 130% पेक्षा जास्त वाढले आहेत. 20 फेब्रुवारी 2025 रोजी या स्मॉल-कॅप हार्डवेअर कंपनीचे शेअर्स 1618.60 होते. 20 फेब्रुवारी 2026 रोजी कंपनीचे शेअर्स 3750.05 च्या उच्चांकावर पोहोचले. गेल्या दोन वर्षांत, कंपनीचे शेअर्स 155% पेक्षा जास्त वाढले आहेत.
नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडियाचे मार्केट कॅप शुक्रवार 20 फेब्रुवारी 2026 रोजी 20,725 कोटी ओलांडले. डिसेंबर 2025 च्या तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, प्रमोटर्सकडे कंपनीच्या 71% हिस्सा आहे, तर सार्वजनिक शेअरहोल्डिंग 29% आहे.
T20 World Cup दरम्यान दक्षिण आफ्रिकेने केली मोठी घोषणा, बदलला कर्णधार; कारण काय?
कंपनी काय करते ?
नेटवेब टेक्नॉलॉजीज हाय परफॉर्मन्स असलेल्या संगणकीय सिस्टीमची रचना आणि निर्मिती करते. सुपरकॉम्प्युटर, एआय सिस्टम, प्रायव्हेट क्लाउड, स्टोरेज सोल्यूशन्स आणि एंटरप्राइझ डेटा सेंटर्ससारख्या मागणी असलेल्या संगणकीय वातावरणासाठी कंपनीने स्वतःला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा एंड-टू-एंड प्रदाता म्हणून स्थान दिले आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, कंपनी टायरोन ब्रँड नावाखाली हाय परफॉर्मन्स असलेल्या संगणकीय सिस्टम विकते, ज्याचा तिच्या महसुलात 35 % पेक्षा जास्त वाटा आहे. कंपनीच्या ऑफरमध्ये एचपीसी क्लस्टर्स आणि जीपीयू-ऑप्टिमाइज्ड संगणकीय सिस्टीमचा समावेश आहे.
