मोदी सरकारचा मोठा निर्णय! आता दर 6 तासांनी ऑटो-लॉग आउट होणार व्हॉट्सअ‍ॅप; नवा नियम काय?

व्हॉट्सअॅपसह अनेक अॅप्स यूजर्ससाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, फोनमधून सिम कार्ड काढून टाकताच बंद होणार अॅप...

मोदी सरकारचं मोठा निर्णय! आता दर 6 तासांनी ऑटो-लॉग आउट होणार व्हॉट्सअॅप; नवा नियम काय?

मोदी सरकारचं मोठा निर्णय! आता दर 6 तासांनी ऑटो-लॉग आउट होणार व्हॉट्सअॅप; नवा नियम काय?

India To Mandate Active SIM For WhatsApp And Messaging Apps Know About New SIM Binding Rules :  लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपसह अनेक अ‍ॅप्स यूजर्ससाठी मोदी सरकारने (Modi Government) मोठा निर्णय घेतला असून, आता दर सहा तासांनी तुम्ही वापरत असलेलं व्हॉट्सअ‍ॅप ऑटो-लॉग आउट होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम आणि सिग्नल सारख्या सर्व मेसेजिंग अ‍ॅप्ससाठी हे कडक सायबरसुरक्षा नियम लागू करण्यात आले आहेत. नेमका नियम काय? आणि कठोर नियम आणण्यामागचं कारण काय? याचा यूजर्सवर काय परिणाम होणार आणि SIM-बाइंडिंग काय? याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेऊया…

मोठी भविष्यवाणी! ‘‘AI युगात गरिबी संपेल, पैशांची गरज राहणार नाही; नोकरी फक्त छंद राहिल”

कधीपासून लागू होणार नियम

व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम आणि सिग्नल सारख्या सर्व मेसेजिंग अ‍ॅप्सवर लॉगिन करण्यासाठी एक सक्रिय सिम कार्ड फोनमध्ये असणे अनिवार्य असेल. हे सिम फोनमधून काढताच संबंधित अ‍ॅप लगेच बंद होतील. जर, तुम्ही वरील अ‍ॅप वेब म्हणजेच लॅपटॉपवर वापरत असाल तर, दर सहा तासांनी आपोआप लॉग आउट होणार आहेत. सायबर फसवणूक, स्पॅम आणि परदेशातून चालणाऱ्या फसव्या नेटवर्क्सना रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचा दावा दूरसंचार विभागाने केला आहे. फेब्रुवारी 2026 पासून हे नियम देशभरात लागू केले जाणार आहेत.

दूरसंचार विभागाच्या दूरसंचार सायबरसुरक्षा सुधारणा नियम 2025 अंतर्गत, व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, सिग्नल आणि सर्व चॅट अ‍ॅप्स 24 तास सिमशी जोडलेले असतील. जर एखाद्या यूजरने त्यांच्या फोनवरून तयार केलेले त्यांचे मेसेजिंग अकाउंट सिम कार्ड काढून टाकले तर, अ‍ॅप लगेच काम करणे थांबवेल. सध्या हे अ‍ॅप्स फक्त एकदाच ओटीपी वापरून नंबरची पडताळणी करतात त्यानंतर सिम काढून टाकल्यानंतरही बराच काळ चालू राहतात.

आधारचं विदआऊट इंटरनेट अन् पेपरलेस व्हेरिफिकेशन करता येणार; सरकारचा भन्नाट प्लॅन वाचलात का?

वेब सर्व्हर दर 6 तासांनी ऑटो-लॉग आउट होणार

सरकारच्या नव्या नियमांमुळे वेब-आधारित लॉगिनसाठीचे नियम पूर्णपणे बदलणार असून, आता, व्हॉट्सअ‍ॅप वेब, टेलिग्राम वेब किंवा कोणत्याही चॅट सेवेचे वेब व्हर्जन दर सहा तासांनी आपोआप लॉग आउट होईल. त्यानंतर यूजर्सना जर पुन्हा लॉगिन करायचे असेल तर, QR कोड वापरून लॉगइन करणे आवश्यक असेल. सध्या, व्हॉट्सअ‍ॅप वेब केवळ 14 दिवस न वापरल्यास लॉग आउट होते. मात्र, आता दर 6 तासांनी सर्व वेब आधरित अ‍ॅप ऑटो लॉगआउट होणार आहेत. भारताबाहेर बसून वेबवरून न शोधता न येणाऱ्या लॉगिन अ‍ॅक्टिव्हिटीचा वापर करून फसवणूक करण्यचे प्रकार वाढत आहेत. मात्र, नव्या कायद्यामुळे विदेशात बसून फसवणूक करणाऱ्या भामट्यांना आळा बसेस असे सरकारचे दावा आहे.

नवीन सिम आधारित लॉगिन नियमात कोण-कोणते अ‍ॅप्स?

हा नियम टेलिकम्युनिकेशन आयडेंटिफायर युजर एन्टीटीज म्हणून वर्गीकृत केलेल्या सर्व मेसेजिंग अ‍ॅप्सना लागू असेल. यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप, मेटा मेसेंजर, टेलिग्राम, सिग्नल, स्नॅपचॅट, जिओचॅट, जोश आणि अरताई सारख्या प्लॅटफॉर्मचा समावेश असेल. या सर्वांना 90 दिवसांच्या आत सिम बाइंडिंग सिस्टम लागू करणे आवश्यक असेल. याव्यतिरिक्त, लॅपटॉप किंवा पीसीवर हे अ‍ॅप्स वापरणाऱ्या वापरकर्त्यांना वेळोवेळी SIM आधारित ऑथेंटिकेशन पूर्ण करणे अनिवार्य असेल.

750 CIBIL स्कोअर तरीही बँकेने कर्ज नाकारलं? RBI ने सांगितली रिजेक्ट होण्याची कारणं

यूजर्सवर काय परिणाम होणार?

नवीन नियम लागू झाल्यानंतर, यूजर्सना त्यांच्या फोनमध्ये सक्रिय सिम टाकल्यानंतरच त्यांचे मेसेजिंग अ‍ॅप्स वापरता येतील. याचा अर्थ असा की, मल्टी-डिव्हाइस मोडमध्ये सिमशिवाय WhatsApp किंवा Telegram सतत वापरता येणार नाही. फोनमधून सिम कार्ड काढून टाकल्यानंतर अ‍ॅप बंद होईल. याव्यतिरिक्त, वेब व्हर्जन वापरणाऱ्यांचे लॉगिन दर सहा तासांनी ऑटो लॉगआउट होणार असून, पुन्हा लॉगिन करण्यासाठी QR कोड स्कॅन करणे अनिवार्य असेल. जे यूजर्स सिम कार्डशिवाय टॅबलेट किंवा अन्य डिव्हाइसवर WhatsApp चा वापरतात त्यांच्यावर नव्याने लागू होणाऱ्या नियमांचा सर्वाधिक परिणाम होणार आहे.

Exit mobile version