AI Cancer Test : कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे. या आजाराचं प्रमाण आज वेगाने वाढत चाललं आहे. कॅन्सरचं (AI Cancer Test) निदान होताच रुग्णाला मानसिक धक्का बसतो. त्याला त्याच्या जिवाची भीती वाटते. या आजारावरील उपचार आणि निदान या दोन्ही गोष्टी खूप खर्चिक आहेत. अशा परिस्थितीत एक दिलासा देणारी बातमी आली आहे. कॅन्सर टेस्टिंगमधील अडचणी कमी होणार आहेत. जर आम्ही म्हणालो की रक्ताच्या एक लहानशा थेंबातूनही कॅन्सर आहे की नाही याचे निदान होऊ शकते. यावर तुम्ही कदाचित विश्वास ठेवणार नाही. पण हे खरं आहे. फ्रॅगल नामक नवीन आणि स्मार्ट AI टूलच्या मदतीने कॅन्सरचं निदान शक्य आहे.
फ्रॅगल या स्मार्ट एआय टूलच्या (Fragle AI Tool) मदतीने कॅन्सरची तपासणी केली जाऊ शकते. सिंगापूरच्या शास्त्रज्ञांनी टूल तयार केलं आहे. या टूलच्या मदतीने रक्तात लपलेले कॅन्सरचे संकेत शोधण्यात मदत मिळते. विशेष म्हणजे, फ्रॅगल अतिशय कमी वेळात आणि कमी खर्चात काम करतो.
माणसाच्या रक्तात डीएनएचे छोटे तुकडे असतात. जर कुणाला कॅन्सर असेल तर ट्यूमरमुळे DNA तील ctDNA नावाचे काही (Blood Cancer) लहान तुकडे रक्तात येतात. फ्रॅगल तुकड्यांची लांबी मोजतो आणि सांगतो की यात कॅन्सर असणारा डीएनएन आहे किंवा नाही. सोप्या शब्दांत सांगायचं तर फ्रॅगल रक्तात असणाऱ्या कॅन्सरचा शोध घेतो.
कॅन्सरच्या अन्य सर्व तपासण्यांच्या तुलनेत ही तपासणी स्वस्त आहे. या पद्धतीने तपासणी केली तर तीन हजार रुपये खर्च येतो. जु्न्या टेस्टसाठी मात्र 60 हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. या टेस्टसाठी अत्यंत कमी रक्ताची गरज असते. विशेष म्हणजे याचा वापर वारंवार करता येतो. यातून डॉक्टरांच्याही लक्षात येतं की रुग्णावर होत असलेले उपचार योग्य आहेत की नाही.
फ्रॅगल टेस्ट रुग्णांसाठीही दिलासादायक ठरते. कारण यातून उपचार प्रभावी आहेत की नाही याचं उत्तर मिळतं. कॅन्सर पुन्हा येत तर नाही ना याचीही माहिती याद्वारे मिळू शकते. जास्त खर्च नाही आणि रुग्णांनाही वेदना न होता नियमित तपासणी करता येऊ शकते. या तपासणीसाठी जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत.
सध्या सिंगापूरमध्ये या पद्धतीने कॅन्सरची तपासणी केली जात आहे. रिपोर्ट्सनुसार सिंगापूरमध्ये 100 कॅन्सरग्रस्त रुग्णांवर दर दोन महिन्यांतून या पद्धतीचा वापर केला जात आहे. डॉक्टर सध्या या तपासण्यांचे विश्लेषण करत आहेत की ctDNA मध्ये कसे बदल होत आहेत. तसेच उपचारांना रुग्णांचे शरीर कशा पद्धतीने प्रतिसाद देत आहे.