Download App

NIRRCH संस्थेत ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला मिळणार 70 हजार रुपये पगार

मुंबईतील राष्ट्रीय प्रजनन एवं बाल स्वास्थ अनुसंधान संस्थान अंतर्गत भरती प्रक्रिया राबवली जाते. खाते सल्लागार पदासाठी ही भरती आहे.

  • Written By: Last Updated:

NIRRCH Mumbai Recruitment 2024 : आज अनेकजण सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात आहे. मात्र, या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवणं हे मोठं आव्हान आहे. दरम्यान, तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक गुड न्यूज आहे. मुंबईतील राष्ट्रीय प्रजनन एवं बाल स्वास्थ अनुसंधान संस्थान (National Institute of Reproductive and Child Health Research) अंतर्गत भरती प्रक्रिया राबवली जातेय. या पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे? अर्ज करण्याची अंतिम तारीख काय? याच विषयी जाणून घेऊ.

Pakistan Team : टीम इंडियाच्या विश्वचषकाचा ‘हिरो’, पाकिस्तानचा हेड कोच; PCB ने केलं कन्फर्म 

राष्ट्रीय प्रजनन एवं बाल स्वास्थ अनुसंधान संस्थान अंतर्गत खाते सल्लागार या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जातेय. या पदभरतासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा लागणार आहे.

पदांचा तपशील –
राष्ट्रीय प्रजनन एवं बाल स्वास्थ अनुसंधान संस्थान अंतर्गत खाते सल्लागार पदासाठी एकूण 1 जागा उपलब्ध आहे.

ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करावं, नगरमध्ये झळकलं बॅनर 

शैक्षणिक पात्रता-
खाते सल्लागार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे संबंधित क्षेत्रातील पदवी शिक्षण असणे आवश्यक आहे. यासोबत उमेदवाराला IT/GST TDS संबंधित कामाचे ज्ञान असावे. प्रशासन/आस्थापना संबंधित कामाचे ज्ञान असणंही गरजेचं चआहे. उमदेवारला MS-Word/PPT/Excel मध्ये काम करता येणं गरजेचं आहे. सोबतच इंग्रजी आणि हिंदी भाषेवर चांगले प्रभुत्व. असावे.

पगार
खाते सल्लागार पदासाठी उमेदवाराची निवड झाल्यानंतर, उमदेवारांना महिन्याला 70,000/- रुपये वेतन दिले जाईल.

अधिकृत वेबसाईट-
https://nirrch.res.in/

अधिसूचना –
https://nirrch.res.in/wp-content/uploads/2024/04/Consultant-Accounts-Advt.pdf

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2024 आहे.

अर्ज प्रक्रिया-

वरील पदासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
प्राप्त अर्जामधून संबंधित पदासाठी निवड ही मुलाखतीद्वारे होईल. नोकरीचा अर्ज भरताना उमेदवारांनी त्यांची संपूर्ण आणि अचूक माहिती भरावी.
तसेच, या पदासाठी अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सबमिट करणे आवश्यक आहे. उशीरा आलेले अर्ज नाकारले जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 

follow us