‘या’ सरकारी नोकऱ्यांसाठी आताच करा अर्ज, पदवीधर उमेदवारांनी करू शकतात अर्ज
Government Jobs : आज प्रत्येकाला सरकारी नोकरी (Govt job) हवी असते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. पण, स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे.यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. दरम्यान, जर तुम्ही पदवीधर असाल तर तुमच्यासाठी नोकरीची संधी चालून आली. केंद्र सरकारने अनेक राज्यांमध्ये सरकारी नोकऱ्यांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केल्या आहेत.
Rajkumar Rao: राजकुमार रावने पटकावला ओटीटी परफॉर्मर ‘ऑफ द इयर’ पुरस्कार
या सर्व पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखही जवळ आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या नोकऱ्यांसाठी त्वरित अर्ज करावा. तुम्ही पदवीधर असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी
बँक ऑफ महाराष्ट्रने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. ज्यामध्ये क्रेडिट ऑफिसर पदावर भरती होणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत साइट bankofmaharashtra.in वर अर्ज करा. या पदासाठी उमेदवार ६०% गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा. यामध्ये एकूण 100 पदांची भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर आहे.
इंडिया एक्सिम बॅंकेने व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती जाहीर केली आहे. ज्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर आहे. यामध्ये एकूण 45 पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्यासाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करणारे उमेदवार संबंधित विषयातील पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असावेत. या भरतीसाठी अप्याय करणाऱ्या उमेदवारांचे वय हे 21 ते 28 वर्षे इतके असावे.
AIIMS मध्ये नोकरी
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) मध्ये नोकरी मिळवण्याचे देशभरातील अनेकांचे स्वप्न असते. मात्र, आजच्या स्पर्धात्मक युगात कोणत्याही महत्त्वाच्या संस्थेत नोकरी मिळणे हे अत्यंत अवघड काम आहे. मात्र, तुम्ही ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असाल, AIIMS मध्ये सध्या बंपर भरती सुरू आहे. तुम्हाला AIIMS नागपूरमध्ये असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही अधिकृत साइट aiimsnagpur.edu.in वर जाऊन अर्ज करू शकता. शेवटची तारीख 4 नोव्हेंबर आहे. तर, हार्ड कॉपी सबमिट करण्याची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2023 आहे. उमेदवारांकडे एमडी, एमएस, डीएम, एमडीएस किंवा एमसीएच असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय पदानुसार 50/58 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, बिलासपूर यांनी कनिष्ठ निवासी पदाच्या 141 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी aiimsbilaspur.edu.in या संकेतस्थळावरून जाऊन उमेदवारांना अर्ज करावा लागले. या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. मुलाखत 7 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केले जाईल. अर्जदाराने DCI द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून BDS उत्तीर्ण केलेला असावा. या भरतीसाठीसाठी मुलाखती ही प्रशासकीय ब्लॉक, तिसरा मजला, एम्स-बिलासपूर, कोठीपुरा, हिमालच प्रदेश येथे आयोजित केली आहे.