NIV Pune Bharti 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी (National Institute of Virology) पुणेने ‘तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ-1’ पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या पद भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार हे या भरतीसाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करू शकतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी रिक्रुटमेंट 2023 साठी अर्जाची शेवटची तारीख, वयोमर्यादा आणि पगार याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.
Alia Bhatt : क्यूट अभिनेत्री आलिया भट्ट मनमोहक लूक
पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ-1
एकूण पदांची संख्या- 80
शैक्षणिक पात्रता –
तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ-1 या पदांच्या भरतीसाठी उमदेवारांना शैक्षणिक पात्रतेविषयी जाणून घेण्यासाठी उमदेवारांनी संबंधित जाहिरात पाहावी.
नोकरीचे ठिकाण –
या पदभरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पुणे येथे नोकरी करावी लागणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट – https://niv.icmr.org.in/
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023
भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन मिळेल-
तांत्रिक सहाय्यक- 35 हजार 400 रुपये ते 1 लाख 12 हजार 400 रुपये.
तंत्रज्ञ-1- 19 हजार 900 रुपये ते 63 हजार 200 रुपये.
Priyanshu Painyuli: प्रियांशुने मेजर राम मेहताच्या पिप्पातील भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात केलं घर
जाहिरात
https://drive.google.com/file/d/1LbJriUiMx1T-NYCEeYPamv17VX4grepe/view
याशिवाय, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीद्वारे ‘प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II, प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर, प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I’ या पदांसाठी एकूण 13 रिक्त जागा भरल्या जातील. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. या मुलाखती 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी घेतल्या जाणार आहेत.
पोस्ट आणि पोस्टची संख्या:
प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II -04 पदे
प्रकल्प डेटा एंट्री ऑपरेटर – 01 जागा
प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I – 08 पदे
शैक्षणिक पात्रता:
प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट – II – १२वी पास सायन्स आणि डिप्लोमा इन (MLT/DMLT) आणि पाच वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव.
प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर – मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून 12वी उत्तीर्ण आणि अधिसूचनेत नमूद केल्यानुसार संगणकावरील कामाचा अनुभव.
प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I – 10वी आणि डिप्लोमा इन (MLT/DMLT/ITI) आणि दोन वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव.
मुलाखतीचा पत्ता: ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कॉन्फरन्स हॉल, 20-ए, डॉ. आंबेडकर रोड, पुणे-411001.
मुलाखतीची तारीख:
प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II – 29 नोव्हेंबर 2023
प्रकल्प डेटा एंट्री ऑपरेटर – 29 नोव्हेंबर 2023
प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I – 30 नोव्हेंबर 2023