Download App

‘मस्करी नाही, अरे मी खरचं पंतप्रधानाची सासू…’ सुधा मुर्तींनी सांगितला ‘तो’ किस्सा

Sudha Murthy : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांच्या पत्नी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या सासू सुधा मूर्ती यांना साधी राहणी अन् उच्च विचारसरणी यासाठी ओळखले जाते. त्यामुळे त्या पंतप्रधानाच्या सासू आहेत यावर कोणाचा विश्वास बसत नाही. अलीकडेच असाच काहीसा अनुभव सुधा मूर्तींनी ब्रिटनमध्ये आला. त्यांच्या या किस्शाची सोशल मीडियावर मोठी चर्चा होतीय. काही दिवसांपूर्वी सुधा मूर्ती आपल्या मुलीला आणि जावयाला भेटायला ब्रिटनला गेल्या होत्या. त्यावेळी विमानतळावरील इमिग्रेशन अधिकारी त्यांचा लंडनमधला ’10 डाऊनिंग स्ट्रीट’चा पत्ता पाहून विश्वास ठेवायला तयार नव्हता.

’10 डाउनिंग स्ट्रीट’ हे ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय आहे. सुधा मूर्ती यांनी इमिग्रेशन फॉर्ममध्ये याचा उल्लेख केला होता. अलीकडे, ‘द कपिल शर्मा शो’ दरम्यान, सुधा मूर्ती यांनी हा अद्भुत किस्सा सांगितला. भारतीय वंशाचे ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांचे लग्न सुधा मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीशी झाले आहे.

या भाज्यांच्या सेवनाने तुमचे हृदय होईल मजबूत

नारायण मूर्ती यांच्या पत्नी असण्यासोबतच सुधा मूर्ती ह्या प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका देखील आहेत. एवढे सगळे असूनही सुधा मुर्ती अतिशय साधेपणाने जगतात. त्यांचा साधेपणा अनेकांना आश्चर्यचकित करतो. साधेपणा हा सर्वात मोठा अलंकार असल्याचे त्या मानतात.

कपिल शर्मा शोच्या एका एपिसोडमध्ये सुधा मुर्ती म्हणाल्या की मी ब्रिटनच्या पंतप्रधानांची सासू असू शकते यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. मी नुकतीच आपल्या मुलीला भेटण्यासाठी यूकेला गेले होते. विमानतळावर उतरल्यानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्याने निवासी पत्त्याबद्दल विचारले. त्यावेळी विचारण्यात आले की लंडनमध्ये कुठे राहतात.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

त्यावेळी सुधा मुर्तींची मोठी बहीणही त्यांच्यासोबत होत्या. ’10 डाउनिंग स्ट्रीट’ हा पत्ता लिहावा असे दोघांनाही वाटले. सुधा मूर्तींचा मुलगाही ब्रिटनमध्ये राहतो. पण, त्यांना त्यांच्या मुलाचा पूर्ण पत्ता आठवत नव्हता. म्हणून, त्यांनी 10 डाउनिंग स्ट्रीट पत्ता लिहिला.

इमिग्रेशन अधिकाऱ्याने तिच्याकडे अविश्वासाने पाहिले आणि विचारले, “मस्करी करताय का?” मग मी म्हणाले, “नाही, मी खरं सांगतीय.” यानंतर इमिग्रेशन अधिकारी पूर्णपणे चक्रावून गेले. त्याला धक्काच बसला. समोर साध्या साडीत उभी असलेली ती महिला दुसरी कोणी नसून आपला देश चालवणाऱ्या पंतप्रधानांच्या सासूबाई होत्या यावर विश्वास ठेवणे तिला कठीण जात होते.

Prashant Damle: अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले

आपल्या या अनुभवाचे वर्णन करताना त्या पुढे म्हणाल्या की, दिसणे फसवे असू शकते. लोकांबद्दल त्यांच्या दिसण्यावर आधारित गृहीतके बांधणे सोपे आहे, परंतु ते गृहितक अनेकदा चुकीचे ठरू शकतात. सुधा मूर्ती यांना नुकतेच पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतरत्न आणि पद्मविभूषण नंतर हा देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

Tags

follow us