Prashant Damle: अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले

Prashant Damle: अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले

Natya Parishad Election : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad President Election) अध्यक्षपदासाठी आज निवडणूक झाली आहे. प्रशांत दामले (Prashant Damle) विरूद्ध प्रसाद कांबळी (Prasad Kambali) अशी ही निवडणूकीची लढत पाहायला मिळाली आहे. यावरून अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची प्रतिक्षा सगळ्यांनाच होती.

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले (Prashant Damle) यांची निवड झाली आहे. प्रसाद कांबळी (Prasad Kambli) यांचे ‘आपलं पॅनल’ आणि प्रशांत दामले (Prashant Damle) यांचं ‘रंगकर्मी समूह’ या दोन गटात जोरदार चुरस रंगली होती. प्रसाद कांबळी आणि प्रशांत दामले या दोघांमध्ये कोण लढत जिंकणार याची मोठी उत्सुकता ताणली गेली होती. अखेर निकाल हाती आला आहे. सर्वांचे लक्ष वेधून लागलेली जागा म्हणजे नाट्यपरिषदेचे अध्यक्षपद प्रशांत दामले यांनी बाजी मारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prashant Damle (@damleprashant)


यामुळे आता अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेहोते. माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलमध्ये 10.30 च्या सुमारास निवडणूक पार पडली आहे. नियामक मंडळाचे ६० सदस्य १९ जणांना मतदान केले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये १ अध्यक्ष, २ उपाध्यक्ष, १ कार्यवाहक, ३ सहकार्यवाहक, १ कोषाध्यक्ष आणि ११ सभासदांचा समावेश होता.

नाट्यपरिक्षदेचा अध्यक्ष आणि कार्यवाही यांच्यासह या अन्य नेमणूका देखील महत्त्वाच्या ठरले. तसेच विनाश नारकर, अजित भुरे, वीणा लोकूर, भाऊसाहेब भोईर, शैलेश गोजमगुंडे, सतीश लोटके, समीर इंदुलकर, सुकन्या कुलकर्णी, ऐश्वर्या नारकर, सविता मालपेकर, सुशांत शेलार हे कार्यकारी समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होते.

Cannes Film Festival 2023 : ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ला आजपासून सुरुवात; ‘या’ अभिनेत्रीचा रेड कार्पेटवर डेब्यू!

प्रशांत दामलेंच्या रंगकर्मी नाटक समूहाचे कार्यकारिणीवर वर्चस्व

‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’च्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. प्रशांत दामलेंच्या (Prashant Damle) ‘रंगकर्मी नाटक समूहा’चे कार्यकारिणीवर वर्चस्व पाहायला मिळाला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 11 जणांची कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. यामध्ये सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संदीप तेंडुलकर, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगेंचा कार्यकारिणीत समावेश होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube