Download App

WhatsApp Channels: आता इंन्स्टाप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपवरही फॉलोअर्स बनवा; नवीन चॅनेल फीचर लॉन्च, असा करा वापर…

WhatsApp Channels : व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) एक नवीन फीचर (Feature ) आणलं आहे. चॅनल असं या फीचरचं नाव आहे. व्हॉट्सअ‍ॅपची (WhatsApp) पॅरेन्ट कंपनी असलेल्य मेटाने (META) याबद्दल सांगितले आहे की, या फिटरच्या मदतीने सामान्य युझर्स तसेच संस्था त्यांची आवश्यक माहिती याद्वारे युझर्सपर्यंत पाठवू शकतात. यामुळे इंन्स्टाग्रामप्रमाणे (Instagram) व्हॉट्सअ‍ॅपवरही फॉलोअर्स बनवता येणार आहेत. अगोदर तुम्हाला चॅनेल तयार करावे लागणार आहे. तर स्टेटस प्रमाणे अपडेट नावाचं आणखी एक टॅब तुम्हाला या फीचरमध्ये मिळणार आहे. ( Now can make Followers on WhatsApp like Instagram by new Channels Feature )

पालकांनो सावधान! इन्स्टाग्राम बनले लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचा अड्डा; टास्क फोर्स करणार तपास

या नव्या फीचरमध्ये युझर्स आपल्या आवडत्या चॅनेलला फॉलो करू शकणार आहेत. यामद्ये सुरक्षिततेची देखील काळजी घेण्यात आली आहे. आतापर्यंत सामान्यतः युझर्स व्हॉट्सअ‍ॅपवर दुहेरी संवाद करू शकत आहेत. मात्र या चॅनलवर असं नसेल यावर केवळ चॅनलचे निर्मातेच संवाद साधू शकतील म्हणजे आपली माहिती पोहचवू शकतील.

आता डेबिट कार्डशिवाय ATM मधून काढा पैसे; भारतात UPI कॅश विड्रॉल सिस्टिमची सुरुवात

त्यामुळे या चॅनेलवर तुम्ही फॉलो केलेल्या चॅनलवर तुम्ही रिप्लाय करू शकणार नाही. तर तुम्ही तुमच्या आवडीच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला फॉलो करण्यासाठी तुम्हाला निर्माते किंवा इतरांकडून आलेल्या लिंकवरून हे चॅनेल्स फॉलो करता येतील तसेच कंपनीकडून एक विविध कॅटेगेरी असणारी डायरेक्टरी देखील तयार करण्यत येत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्पोर्ट्स, हॉबी किंवा लोकल ऑफिशिअल सारखे चॅनेल शोधू शकता.

संबंधित चॅनेल फॉलो करण्यासाठी चॅनेलच्या पुढे प्लसचे चिन्ह असेल त्यावर क्लिक करून तुम्ही ते चॅनेल फॉलो करू शकता. मात्र एक लक्षात ठेवा सामान्य व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रमाणे हे चॅनेल एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड नसणार आहे. त्यामुळे फॉलोअर्स अ‍ॅडमीनचं प्रोफाईल किंवा फोन नंबर नाही पाहू शकणार. तर अ‍ॅडमीनही फॉलोअर्सचा फोन नंबर नाही पाहू शकणार. तर चॅनेलची हिस्ट्री देखील केवळ 30 दिवसांसाठीच स्टोअर राहू शकणार आहे. सध्या हे फीचर सिंगापुर आणि कोलंबिया या देशांमध्ये लॉन्च करण्यात आलं आहे.

Tags

follow us