OnePlus 13 : बाजारात पुन्हा एकदा धमाका करत टेक कंपनी OnePlus ने आपला नवीन फोन लाँच केला आहे. या फोनमध्ये कंपनीने भन्नाट फीचर्स आणि पॉवरफुल प्रोसेसर दिलं आहे. बाजारात कंपनीने हा नवीन फोन OnePlus 13 नावाने लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वालकॉम प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 8 एलिट देण्यात आला आहे. कंपनीने सध्या हा फोन चिनी बाजारपेठेमध्ये लाँच केले आहे तर पुढील काही दिवसात हा फोन भारतीय बाजारासह जगातील बाजारपेठेत लाँच केला जाणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने या फोनमध्ये Dolby Vision सपोर्ट आणि Hasselblad फ्लॅगशिप ट्रिपल कॅमेरा सेटअप असलेला डिस्प्ले दिला आहे. तसेच या फोनमध्ये फ्लॅगशिप BOE डिस्प्ले 6000mAh क्षमता आणि IP69 संरक्षण रेटिंग असलेली बॅटरी देण्यात आली आहे. याच बरोबर बॅटरी चार्जसाठी कंपनीने तब्बल 100W फास्ट चार्जर दिला आहे. याचबरोबर फोन 24GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज ऑफर करते. बाजारात हा फोन कंपनीने व्हाइट, ऑब्सिडियन आणि ब्लू या तीन रंगामध्ये लाँच केला आहे.
OnePlus 13 फीचर्स
कंपनीने OnePlus 13 मध्ये BOE चा फ्लॅगशिप X2 OLED डिस्प्ले दिले आहे.हे डिस्प्ले पॅनल 120Hz रिफ्रेश दर आणि 4500nits पर्यंत ब्राइटनेस देते. तसेच अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर देखील तुम्हाला या फोनमध्ये पाहायला मिळणार आहे. हे डिस्प्ले पाणी आणि धूळ यामुळे खराब होण्याची भीती नाही. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिप असून 24GB पर्यंत (12GB इंस्टॉल + 12GB व्हर्च्युअल) रॅम देण्यात आली आहे.
OnePlus 13 मध्ये बॅक पॅनलवर हॅसलब्लॅड ब्रँडिंगसह कॅमेरा मॉड्यूल उपलब्ध आहे. फोनमध्ये OIS सपोर्टसह 50MP मेन सोनी कॅमेरा सेन्सर 50MP अल्ट्रावाइड आणि 50MP टेलिफोटो सेन्सर आहे. OnePlus 13 मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32MP फ्रंट कॅमेरा आहे. यात Android 15 वर आधारित ColorOS 15 आहे. तसेच, फोनची 6000mAh बॅटरी 1000W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
20 नोव्हेंबरपूर्वीच शरद पवारांना निवडणूक आयोगाकडून दिलासा, ‘तुतारी’ बाबत मोठा निर्णय
OnePlus 13 किंमत
कंपनीने 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरियंट व्हेरियंटसाठी किंमत 4,499 चीनी युआन म्हणेजच (53,100 रुपये) ठेवली आहे. तर टॉप 12GB RAM आणि 1TB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 5,999 चीनी युआन (सुमारे 70,800 रुपये) आहे.