PAN Card Rules : देशात ‘या’ 5 कामांसाठी पॅन कार्ड अनिवार्य ; चूक झाली तर 10 हजारांचा दंड

PAN Card Rules  :  आपल्या देशात आयकर रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्डचा वापर होतो मात्र तुम्हाला माहिती आहे का? आयकर रिटर्नसह देशात असे

PAN Card Rules

PAN Card Rules

PAN Card Rules  :  आपल्या देशात आयकर रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्डचा वापर होतो मात्र तुम्हाला माहिती आहे का? आयकर रिटर्नसह देशात असे अनेक आर्थिक व्यवहार आहेत, ज्यांच्यासाठी पॅन कार्ड देणे अनिवार्य आहे. तुम्ही मालमत्ता खरेदी करत असाल, वाहन खरेदी करत असाल किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला पॅन कार्ड देणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे आयकर विभाग तुमच्या पॅन क्रमांकाचा वापर करुन तुमच्या मोठ्या व्यवहारांवर लक्ष ठेवतो. पॅन कार्ड आवश्यक असणारे पाच प्रमुख व्यवहार आणि चुकीचा पॅन क्रमांक दिल्यास काय दंड होऊ शकतो याबाबत जाणून घ्या.

या 5 आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड अनिवार्य  

मालमत्तेची खरेदी किंवा विक्री

20  लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची कोणतीही मालमत्ता, जसे की घर, दुकान किंवा जमीन खरेदी किंवा विक्री करताना.

वस्तू किंवा सेवांची खरेदी

एकाच व्यवहारात 2 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू किंवा सेवा खरेदी करताना.

लिस्टिंग नसलेले शेअर्स

1 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे, शेअर बाजारात लिस्टिंग नसलेले शेअर्स खरेदी किंवा विक्री करताना.

वाहनाची खरेदी

5 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची कार किंवा मोटारसायकल खरेदी करताना.

डीमॅट खाते आणि गुंतवणूक

शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते उघडताना.

पॅन कार्ड न दिल्यास किंवा चुकीचा पॅन क्रमांक दिल्यास नोटीस ?

जर तुम्ही यापैकी कोणत्याही व्यवहारासाठी पॅन कार्ड दिले नाही, तर संबंधित संस्था किंवा घटक तुमच्यासोबतचा व्यवहार पूर्ण करण्यास नकार देऊ शकतात. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या व्यवहारासाठी तुमचा पॅन क्रमांक देता, तेव्हा ती माहिती TDS, TCS, SFT आणि AIS (ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट) सारख्या सिस्टमद्वारे प्राप्तिकर विभागापर्यंत पोहोचवली जाते. जर तुमच्या घोषित वार्षिक उत्पन्नात आणि मोठ्या खर्चांमध्ये मोठी तफावत आढळली, तर प्राप्तिकर विभाग तुम्हाला स्पष्टीकरण मागण्यासाठी नोटीस पाठवू शकतो.

चुकीचा पॅन (PAN) दिल्यास 10,000 रुपयांपर्यंत दंड

आयकर नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून किंवा नकळतपणे चुकीचा किंवा बनावट पॅन (PAN) दिला, तर त्यांना 10,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. याव्यतिरिक्त, चुकीचा पॅन दिल्यास तुम्हाला टॅक्स क्रेडिट्स (उदा. TDS क्रेडिट्स) मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. यामुळे तुमच्या आर्थिक नोंदींमध्ये विसंगती निर्माण होऊ शकते आणि आयकर विभागाद्वारे तुमच्या प्रकरणाची छाननी (scr scrutiny) होण्याची शक्यता वाढू शकते.

हार्दिकनंतर मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार कोण? रोहित शर्मासह स्टार खेळाडू चर्चेत –

आयकर विभाग यावर लक्ष कसे ठेवतो?

तुमचा पॅनसंपूर्ण कर सिस्टममध्ये एक यूनिक ओळख नंबर म्हणून काम करतो. तुमच्या बँक ठेवी, म्युच्युअल फंड गुंतवणूक, शेअर बाजारातील व्यवहार, मालमत्ता खरेदी आणि परदेशात पाठवलेली रक्कम यांसारखी सर्व माहिती तुमच्या पॅनशी जोडलेली असते. आयकर विभाग डेटा ॲनालिटिक्स आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून या माहितीची पडताळणी करतो.

Letsupp दिवाळी अंक 2026 महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Exit mobile version