Download App

सप्टेंबरपासून ATM मधून 500 रुपयांच्या नोटा निघणार नाही? मेसेज व्हायरल, जाणून घ्या सत्य

PIB Fact Check : मागील काही वर्षांपासून भारतात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा फायदा घेत फसवणूक करणारे दररोज दिशाभूल

  • Written By: Last Updated:

PIB Fact Check : मागील काही वर्षांपासून भारतात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा फायदा घेत फसवणूक करणारे दररोज दिशाभूल करणारे दावे सोशल मीडियावर करत असतात. तर आता सप्टेंबर महिन्यापासून एटीएममधून (ATM) 500 रुपयांच्या नोटा निघणार नसल्याचा दावा आरबीआयचे (RBI) नाव घेऊन करण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजनुसार, देशाची सर्वात मोठी बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा काढणे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत असा दावा करण्यात येत आहे. तर आता पीबीआयने फॅक्ट चेक करत हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे.

मेसेज पूर्णपणे फेक

या व्हायरल मेसेजबाबत पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) सोशल मीडियावर व्हायरल मेसेजचा दावा फेटाळून लावत मेसेज पूर्णपणे फेक असल्याचे म्हटले आहे. पीबीआय फॅक्ट चेकने दिलेल्या माहितीनुसार, आरबीआयने अशी कोणतीही सूचना जारी केलेली नाही. सप्टेंबर महिन्यात देखील 500 रुपयांच्या नोटा कायदेशीर चलन म्हणून पूर्णपणे वैध राहणार आहे. पीबीआयने स्पष्ट केले की, 500 रुपयांच्या नोटाबद्दल व्हायरल होणारा मेसेज पूर्णपणे फेक आणि दिशाभूल करणारा आहे.

मेसेजमध्ये दावा काय?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला की, आरबीयाने बँकांना सप्टेंबर 2025 पासून देशातील सर्व एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा काढणे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. व्हायरल मेसेजमध्ये आरबीआयचा हवाला देत असा दावा करण्यात आला आहे की मार्च 2026 पर्यंत 75 टक्के एटीएम आणि त्यानंतर 90 टक्के एटीएममध्ये फक्त 200 आणि 100 रुपयांच्या नोटाच वितरित होतील. लोकांना 500 रुपयांच्या नोटा लवकरात लवकर खर्च करण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र आता पीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेला मेसेज पूर्णपणे फेक असून आरबीआयने अशी कोणतीही सूचना दिलेली नाही.

दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका

तर दुसरीकडे पीबीआयने लोकांना अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि ती शेअर करण्यापूर्वी अधिकृत स्रोतांकडून माहितीची पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे.

सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाचे अनेक अडथळे दूर केल्याबद्दल मनःपूर्वक आभार; छगन भुजबळ 

follow us