Post Office Recruitment 2023: दहावी, बारावी उत्तीर्णांना पोस्ट खात्यात नोकरीची संधा, पगार 81 हजार रुपये महिना

Indian Postal Department Bharti 2023 : भारतीय टपाल विभागात (Indian Postal Department) नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध आहे. भारतीय टपाल विभागाने पोस्टल असिस्टंट (Postal Assistant), सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी […]

Post Office Recruitment 2023: दहावी, बारावी उत्तीर्णांना पोस्ट खात्यात नोकरीची संधा, पगार 81 हजार रुपये महिना

Indian Postal Department Bharti 2023

Indian Postal Department Bharti 2023 : भारतीय टपाल विभागा (Indian Postal Department) नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध आहे. भारतीय टपाल विभागाने पोस्टल असिस्टंट (Postal Assistant), सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. भारतीय टपाल विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.

Maratha Reservation : ‘जरांगेंमुळं मराठा तरुणांच नुकसान होतंय’; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप 

पोस्टचे नाव – पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ

एकूण पदांची संख्या- 1899

शैक्षणिक पात्रता –
पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट – पदवी
पोस्टमन/मेल गार्ड – 12वी पास
मल्टी टास्किंग स्टाफ – 10वी पास

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

वयोमर्यादा – 19 ते 27 वर्षे

अर्ज फी – 100 रुपये.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 10 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 डिसेंबर 2023

Mahua Moitra : महुआ मोईत्रांचे ग्रह फिरले! ‘त्या’ अहवालाच्या विरोधात फक्त 4 खासदार 

अधिकृत वेबसाइट – http://www.indiapost.gov.in

या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावा लागतो. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करताना काही चूक झाल्यास अर्ज रद्द केला जाईल, याची नोंद घ्या.

पगार –
निवडलेल्या उमेदवारांना सातव्या वेतनश्रेणीनुसार वेतन दिले जाईल. यासोबतच निवड झालेल्या उमेदवारांना इतर अनेक भत्तेही दिले जातील.
पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट – रु 25 हजार 500 ते रु 81 हजार 100.
पोस्टमन, मेन गार्ड – 21 हजार 700 ते 69 हजार 100 रुपये.
मल्टी टास्किंग स्टाफ – 18 हजार ते 56 हजार 900 रुपये.

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1j8Kgg_xRJX4EiZWTVA5C9UwPVT-tiAw9/view

अर्ज कसा करायचा?
पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. त्यासाठी प्रथम वेबसाईटवर जा. त्यानंतर अर्जाच्या लिंकवर क्लिक करा. मग तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकून नोंदणी करा. उर्वरित अर्ज भरा. सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडा आणि अर्ज सबमिट करा. यानंतर फॉर्मची एक प्रत डाऊनलोड करून तुमच्याजवळ ठेवा..

Exit mobile version