दहावी, बारावी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज

  • Written By: Published:
दहावी, बारावी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज

RRC SECR Recruitment 2023:  भारतीय रेल्वेचे (railways) जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे विभागाच्या देखरेखीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करते. आता रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे विभागात नोकरीची चांगली संधी उपलब्ध आहे. ती म्हणजे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) क्रीडा कोट्याअंतर्गत काही पदांची थेट भरती केली जाणार आहे.

ड्रग्ज प्रकरणात सत्ताधारी आमदारांना १६ लाखांचा हप्ता मिळतो; संजय राऊतांचा दावा

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 नोव्हेंबर 2023 आहे. भरतीसाठी 46 पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.

एकूण रिक्त पदे- 46

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, तसेच मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण, 10वी उत्तीर्ण.

वय श्रेणी –
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांचे किमान वय 18 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि कमाल वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

आवश्यक कागपत्रे-
अर्ज करतांना उमेदवारांना शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, वयाचा पुरावा, फोटो, आधारकार्ड आदी कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.

अर्ज सुरू होण्याची तारीख – 14 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाइट – https://secrindianrailways.gov.in

अर्ज कसा करायचा-
भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, प्रथम वेबसाइटवर जा.
यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
वैयक्तिक तपशील भरून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तयार करा.
यानंतर फॉर्म भरा आणि सबमिट करा.
अर्ज करण्यापूर्वी सूचना सूचना काळजीपूर्वक वाचा.
अर्ज करतांना कोणतीही चुक करू नका, अन्यथा अर्ज नाकारल्या जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

भरती प्रक्रिया –
या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना चाचणीसाठी बोलावले जाईल.
चाचणीत  निवडलेल्या उमेदवारांना भरतीच्या पुढील टप्प्यासाठी आमंत्रित केले जाईल.
चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी, उमेदवारांना 40 पैकी 25 गुण मिळणे आवश्यक आहे.
उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
गुणवत्ता यादी अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.

पगार –
भरतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना स्तर 4/5 आणि CPC 7 नुसार वेतन दिले जाईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube