Download App

पुणे परिमंडलातील 1670 ग्राहकांना अवघ्या 24 ते 48 तासांमध्ये वीजजोडण्या…

Pune Mahavitaran News : पुणे परिमंडल अंतर्गत अस्तित्वात असलेल्या यंत्रणेमधून तब्बल 1670 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांकडे अवघ्या 24 ते 48 तासांमध्ये महावितरणकडून नवीन वीजजोडणी (Power Connection)कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये 24 तासांत 823 तर 48 तासांमधील 847 नवीन वीजजोडण्यांचा समावेश आहे. नवीन वीजजोडण्या देण्यास महावितरणने मोठा वेग दिला आहे. पुणे परिमंडलामध्ये गेल्या जानेवारी ते 14 ऑगस्टपर्यंत साडेसात महिन्यात तब्बल 1 लाख 45 हजार 824 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. यामध्ये घरगुती- 1 लाख 25 हजार 211, वाणिज्यिक-16 हजार 621, औद्योगिक-2304 आणि 1688 इतर वर्गवारीतील वीजजोडण्यांचा समावेश आहे.

Chandrayan 3 : आपल्या खास स्टाईलमध्ये गुगलने सेलिब्रेट केलं भारताचं यश

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वीजजोडण्यांना वेग देण्याची सूचना केली आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी याबाबतची कार्यवाही त्वरित करण्याचे निर्देश दिले आहेत.

‘भाजप नेत्या सना खान यांची हत्या करणाऱ्या अमित साहुला मी..,’ काँग्रेस आमदाराचा खुलासा…

सोबतच पुरेशा प्रमाणात नवीन वीजमीटर देखील उपलब्ध करून दिले आहेत. वीजमीटरची उपलब्धता व नवीन वीजजोडण्यांबाबत संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांच्याकडून सातत्याने आढावा घेण्यात येत आहे.

यासोबतच अस्तित्वात असलेल्या वीजयंत्रणेमधून वीजभाराच्या मागणीसह वीजजोडणी देणे शक्य आहे. अशा ठिकाणी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून फर्म कोटेशनच्या रकमेचा भरणा केल्यास शहरी भागात अवघ्या 24 तर ग्रामीण भागात 48 तासांमध्ये नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यास वेग देण्यात आला आहे. याबाबतचे निर्देश मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी सर्व कार्यालयांना दिले आहेत.

त्यानुसार पुणे परिमंडल अंतर्गत 24 ते 48 तासांमध्ये प्रामुख्याने घरगुतीसह वाणिज्यिक व औद्योगिक 1670 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे शहरात 24 तासांमध्ये 298 व 48 तासांत 371 अशा 669 नवीन वीजजोडण्यांचा तसेच पिंपरी चिंचवड शहरात 24 तासांत 213 तर 48 तासांत 186 अशा 399 वीजजोडण्यांचा आणि ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांत 24 तासांत 312 तर 48 तासांत 290 अशा 602 वीजजोडण्यांचा समावेश आहे.

महावितरणकडून ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार सेवा देण्यास प्रारंभ झाला आहे. पुणे परिमंडलामध्ये मागेल त्यांना नवीन वीजजोडणी ताबडतोब देण्यास वेग देण्यात आला आहे. यामध्ये जेथे शक्य आहे तेथे कोणत्याही प्रकारचा विलंब न करता शहरी व ग्रामीण भागात २४ ते ४८ तासांत नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात येत असल्याचे पुणे परिमंडलचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी सांगितले आहे.

Tags

follow us