Pune Municipal Corporation Recruitment 2023: अनेकजण सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात आहेत. मात्र, आज स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवणं महाकठीण झालं आहे. त्यामुळं अनेकजण पात्रता असूनही खाजगी नोकरी करतांना दिसतात. दरम्यान, तुम्ही जर पशुवैद्यकीय शिक्षण घेतलं असेल आणि उत्तम नोकरीची वाट पाहात असाल तर तुमच्यासाठी चांगली नोकरीची संधी उपलब्ध आहे. पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहिर केली आहे.
शरद पवारांवर टीका करणं अंगलट येणार? नामदेव जाधव यांच्याविरोधात तक्रार दाखल
या भरतीअंतर्गत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार ऑफलाइन पद्धतीने भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर पुणे महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी
एकूण पदांची संख्या – 2
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यकीय शास्त्रात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी. सोबतच संबंधित कामाची तीन वर्षाचा अनुभव
आवश्यक कागपदत्रे-
शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, जातीचा दाखला, आधारकार्ड, दोन फोटो, उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
अर्ज करतांना अर्ज व्यवस्थित भरा. कारण, अर्ज करतांना काही त्रुटी झाल्यास अर्ज नाकारला जाईल, याची नोंद घ्यावी.
The Archies Trailer Out: प्रेम अन् रोमान्स… सुहाना खानच्या ‘द आर्चीज’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज
नोकरीचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
कॅ. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ नोव्हेंबर २०२३
अधिकृत वेबसाइट – https://pmc.gov.in/
पगार –
या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 45 हजार रुपये वेतन दिले जाईल
असा अर्ज करा-
ऑफलाइन मोडद्वारे भरतीसाठी अर्ज करा.
शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवा.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर 2023 आहे.
शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
जाहिरात-
https://drive.google.com/file/d/13D4hDawytJ1iUADhGNuFvdUJvn6HA5jS/view