Download App

ONGC Bharti 2023: पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी, ONGC मध्ये विविध पदांच्या ४४५ पदांसाठी भरती सुरू

  • Written By: Last Updated:

ONGC Bharti 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमदेवारांसाठी एक गुड न्यूज आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात मर्यादित लिमिटेड (Oil and Natural Gas Corporation Limited Limited) अंतर्गत अप्रेंटिस (apprentice) पदांच्या काही रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले असून या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेत. या भरतीअंतर्गत एकूण 445 रिक्त जागा भरायच्या आहेत.

उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागेल. अर्ज 21 सप्टेंबर 2023 पासून सुरू झाले आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबद्दल तपशीलवार माहिती अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिली आहे. या पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. कारण, अर्ज करतांना उमदेवारांकडून काही त्रुटी आढळल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज प्राप्त झाल्यास अर्ज नाकारला जाईल, याची उमदेवारांनी नोंद घ्वावी. तसंच अर्जासोबत आवश्यक ती सगळी कागदपत्रं जोडावी.

पदाचे नाव – अप्रेंटिस

एकूण पदांची संख्या- 445

शैक्षणिक पात्रता – संबंधित क्षेत्रातील पदवी/ITI

वयोमर्यादा –
18 ते 24 वर्षे
ओबीसी प्रवर्गासाठी कमाल वयात 3 वर्षे आणि एससी/एसटी प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट आहे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर

पत्रकारांनी विरोधात बातमी छापू नये यासाठी त्यांना धाब्यावर न्या; बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना सल्ला 

अधिकृत वेबसाइट – http://www.ongcindia.com

निवड प्रक्रिया:
या भरतीसाठी प्राप्त झालेल्या अर्जापैकी योग्य उमदेवारांची निवड केली जाईल. ही निवड पात्रता परिक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे. तर सामान्य मार्क मिळवलेल्या उमेदवारांची निवड ही वय ज्येष्ठतेच्या आधारावर केली जाणार आहे.

असा अर्ज करा-
भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
महत्वाचं म्हणजे, अर्ज करायच्या अंतिम तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज करतांना उमदेवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लॉग इन करावं.
त्यानंतर आवश्यक ती सगळी माहिती भरून अर्ज भरावा.
अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून अर्ज सबमिट करावा.

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/19PKEtJ3ENP3oM8TsM4ifXMEXhrUzJodu/view

Tags

follow us