पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर न्या : विरोधातील बातम्या टाळण्यासाठी बावळकुळेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
अहमदनगर : आगामी वर्षभरात पत्रकारांनी आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, ढाब्यावर न्या, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी अहमदनगरमध्ये बोलताना दिला. दैनिक लोकमतने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 24) शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात महाविजय 2024 विधानसभा पदाधिकाऱी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना बुथ रचना व पदाधिकाऱ्यांनी पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन केले.
आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्नच नाही! शिंदे गटाच्या आमदाराला विश्वास…
बावनकुळे म्हणाले, महाविजय 2024 पर्यंत बूथच्या संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही याची काळजी घ्या, सर्व सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत, हे बघा. ज्या बूथवर तुम्ही काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोक कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत, हे पाहावं. आपण एवढं चांगलं काम करतोय, पण हे असं काही टाकतात की जणू गावात बॉम्बच फुटला.
यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत, त्यांची यादी तयार करा. यात एक, दोन पोर्टलवाले, प्रिंटवाले आणि इलेक्ट्रॉनिकवाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहासाठी बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे, समजलेच असेल तुम्हाला. त्यात काही कमी जास्त झालं तर सुजय विखे आहेतच, असंही त्यांनी सांगितलं.
‘विरोधात बोलल्याचं जिवंत उदाहारण म्हणजे ‘माध्यमांवर बंदी’; सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका
दरम्यान, बावनकुळे यांच्या उपस्थितीत नगर शहरातील माणिक चौकात ‘मन की बात’ हा कार्यक्रम झाला. त्यानंतर त्यांनी तेलीखुंटपर्यंत पायी जात नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे नागरिकांना विविध ठिकाणी स्वागत केले.