मिडल इस्टमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा परिणाम संपूर्ण देशावर होताना दिसत आहे. (Alcohol) पेट्रोल, डिसेल, एलपीजी, खाद्य तेल आणि इतर गोष्टींचे दर आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी दारुचे देखील भाव वाढले होते. दरम्यान, भारतातील एका राज्यात दारुच्या दरांवर मोठी सवलत देण्यात आल्याचे चित्र समोर आले आहे. प्रत्येक दारुच्या ब्रँडवर ५० रुपयांची सूट दिली जात आहे.
राज्य सरकारने दारूच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन सुधारित दर लागू झाले असून, विविध ब्रँड्सच्या किमती १० रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत. मद्य पुरवठादार कंपन्यांनी त्यांच्या किमतीत कपात केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार आता ‘बेबको’ने (Bevco) नवीन दर लागू केले आहेत.
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर स्वयंपाकातील तेल 10 टक्क्यांनी कमी करण्यासाठी फॉलो करा या टिप्स
मिळालेल्या माहितीनुसार, बेबको आउटलेट्सवर अनेक ब्रँड्सची विक्री अपेक्षेप्रमाणे होत नव्हती. जुना स्टॉक लवकर संपवण्यासाठी आणि मागणी वाढवण्यासाठी या किमती कमी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या कपातीमध्ये मल्याळी लोकांमध्ये आधीच लोकप्रिय असलेल्या ब्रँड्सचाही समावेश करण्यात आला आहे.
१०० हून अधिक ब्रँड्स झाले स्वस्त
किमतींमधील ही कपात सुमारे १०० हून अधिक ब्रँड्सवर लागू करण्यात आली आहे. यात ओल्ड मॉन्क (Old Monk), ऑफिसर्स चॉईस (Officer’s Choice) आणि ओल्ड पोर्ट रम (Old Port Rum) यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सचा समावेश आहे. या ब्रँड्सच्या ५०० मिली बाटलीमागे १० रुपयांची कपात करण्यात आली आहे, तर इतर काही ब्रँड्सवर २० ते ५० रुपयांपर्यंत कपात झाली आहे.
| ब्रँडचे नाव | नवीन किंमत (रु.) |
| सदर्न चॉइस प्रीमियम ब्रांडी (Southern Choice Premium Brandy) | ₹१,९२० |
| सदर्न चॉइस ब्रांडी (Southern Choice Brandy) | ₹१,५५० |
| सदर्न चॉइस व्हाईट ब्रांडी (Southern Choice White Brandy) | ₹१,५५० |
| निकोलस ब्लॅक अँड गोल्ड फ्रेंच ब्रांडी VSOP | ₹१,३५० |
| सीबी चॅरिस एन बीव्हर ब्रांडी (CB Charis n Beaver Brandy) | ₹१,३८० |
| निकोलस एक्सेल रिझर्व्ह फ्रेंच ब्रांडी | ₹१,२७० |
| एसपीआय मेट्रो स्पेशल लाईव्ह इंडियन ब्रांडी | ₹१,०६० |
| जीबी प्रीमियम ब्रांडी (GB Premium Brandy) | ₹७८० |
| एसपीआय मेट्रो स्पेशल व्हिस्की (SPI Metro Special Whiskey) | ₹१,०६० |
| सदर्न चॉइस प्रीमियम वोदका (Southern Choice Premium Vodka) | ₹१,९२० |
| सदर्न चॉइस लाईव्ह वोदका (Southern Choice Live Vodka) | ₹१,५५० |
| सीबी चॅरिस एन बीव्हर वोदका (CB Charis N Beaver Vodka) | ₹१,३८० |
| निकोलस व्ही वोदका प्रीमियम ग्रेन | ₹१,२९० |
| एसपीआय एम गोल्ड ऑरेंज वोदका | ₹१,०६० |
| एसपीआय एम गोल्ड वोदका (SPI M Gold Vodka) | ₹३०० |
