Jio Down : देशातील बहुतेक शहरात आज (17 सप्टेंबर) रिलायन्स जिओची सेवा बंद (Jio Down) झाली असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक जिओ यूजर्स नेटवर्कची समस्या येत असल्याची तक्रार सोशल मीडियावर करत आहे. माहितीनुसार, आज दुपारपासून अनेक यूज़र्सना मोबाइल कनेक्टिव्हिटी आणि इंटरनेट सेवेमध्ये समस्या येत आहे.
Down Detector ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सोशल मीडियावर तक्रार नोंदवणाऱ्या यूजर्सची संख्या वाढत आहे. जिओ नेटवर्क समस्या Down Detector नुसार, 17 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12:08 पर्यंत अंदाजे 10,476 यूजर्सनी नेटवर्क आउटेजची तक्रार नोंदवली होती तर तसेच 64 % यूज़र्स ‘नो सिग्नल’ समस्यांना तोंड देत आहे.
20% मोबाइल इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्यांना तोंड देत आहे तर 16% ने Jio फायबर सेवेची प्रॉब्लेम नोंदवली आहे. जिओच्या सर्व सेवांमध्ये समस्या येत असल्याने सोशल मीडियावर नेटिझन्सनी अनेक मीम्स शेअर केले आहे.
Holiday mood On By JIO. 😊
Are You also Facing ?? #JioDown #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस pic.twitter.com/npAHTEtkQJ
— Rakesh choudhary (@Rakeshchou87386) September 17, 2024
तसेच यूजर्सला My Jio App आणि जिओ वेबसाइटवर देखील एक्सेस मिळत नाही. रिलायन्स जिओकडून कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
काँग्रेसलाही लाडकी बहीण योजनेची भूरळ, देणार 3000 रुपये, जाहीरनाम्यात केली मोठी घोषणा