चार्जर, पॉवर बँक विसरा, आता मित्राच्या फोनमधून तुमचा मोबाईल होणार रिव्हर्स चार्जिंग…

Reverse Charging महत्त्वाच्या वेळी बॅटरी संपली आणि चार्जर जवळ नसेल, तर मोठी पंचाईत होते. मात्र, आता पॉवर बँकचीही गरज नाही. कारण

Reverse Charging

Reverse Charging

Can One Phone Charge Another Phone : कल्पना करा… तुम्ही प्रवासात आहात, फोनची बॅटरी अवघी 1 टक्क्यांवर आली आहे आणि चार्जर किंवा पॉवर बँकही जवळ नाही. अशा वेळी दुसऱ्या व्यक्तीच्या फोनमधूनच तुमचा फोन चार्ज होऊ शकतो, असं सांगितलं तर? हे ऐकून आश्चर्य वाटेल ना पण, असं शक्य आहे. नेमकं हे फीचर काय? ते कसं काम करतं त्याबद्दल जाणून घेऊया…

काय आहे रिव्हर्स चार्जिंग?

आजच्या अनेक प्रीमियम स्मार्टफोन्समध्ये रिव्हर्स चार्जिंग (Reverse Charging) हे फीचर उपलब्ध आहे. याच्या मदतीने तुमचा स्मार्टफोन गरज पडल्यास दुसऱ्या स्मार्टफोनसह इतर गॅजेट्सनाही चार्ज करू शकतो. रिव्हर्स चार्जिंग म्हणजे तुमचा स्मार्टफोन स्वतःची बॅटरी वापरून दुसरे डिव्हाइस चार्ज करतो. हे दोन प्रकारे करता येते. एक म्हणजे USB Type-C केबलद्वारे आणि दुसरे म्हणजे Qi वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने. वायरलेस पद्धतीत दोन्ही फोन किंवा डिव्हाइसची मागील बाजू एकमेकांना लावून ठेवावी लागते. जर दोन्ही डिव्हाइस Qi वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करत असतील, तर चार्जिंग आपोआप सुरू होते.

कोणती उपकरणे चार्ज करता येतात?

रिव्हर्स चार्जिंगच्या मदतीने केवळ दुसरा स्मार्टफोनच नाही, तर वायरलेस इअरबड्स, स्मार्टवॉच आणि Qi सपोर्ट असलेली इतर अनेक उपकरणेही चार्ज करता येतात. मात्र, प्रत्येक स्मार्टफोनमध्ये हे फीचर उपलब्ध असेलच असे नाही.

Google Pixel मध्ये ‘Battery Share’

Google च्या Pixel 5 आणि त्यानंतरच्या मॉडेल्समध्ये Battery Share हे फीचर दिले आहे. ते सुरू करण्यासाठी Settings > Battery > Battery Share हा पर्याय सुरू करावा लागतो.

Samsung Galaxy मध्ये कसं सुरू कराल?

तर, सॅमसंगमध्ये ‘Wireless PowerShare’.  सॅमसंगच्या प्रीमियम Galaxy स्मार्टफोन्समध्ये Wireless PowerShare हे फीचर उपलब्ध आहे. यासाठी नोटिफिकेशन पॅनेलमधून हा पर्याय सुरू करून चार्ज करायचे डिव्हाइस फोनच्या मागील बाजूस ठेवले की चार्जिंग सुरू होते. हे फीचर Galaxy Buds, Galaxy Watch तसेच इतर Qi सपोर्टेड उपकरणांसोबत काम करते.

फीचर वापरताना काळजी घेणही महत्त्वाचं

आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोनशिवाय अनेक कामे ठप्प होतात. अशा वेळी चार्जर किंवा पॉवर बँक नसली, तरी Reverse Charging सारखं फीचर मोठा आधार ठरू शकतं. त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनमध्ये Reverse Charging, Battery Share किंवा Wireless PowerShare यांसारखा पर्याय आहे का, हे एकदा नक्की तपासून पाहा. पण,  वायरलेस रिव्हर्स चार्जिंगदरम्यान फोन तुलनेने अधिक गरम होऊ शकतो. त्यामुळे हा पर्याय केवळ गरजेच्या वेळी आणि मर्यादित कालावधीसाठी वापरणे अधिक सुरक्षित मानले जाते.

Exit mobile version