Scientists Turn Sheep Wool Into A Bone Healing Material : तुम्ही आतापर्यंत थंडीपासून वाचण्यासाठी मेंढ्यांच्या लोकरीपासून बनवलेले कपडे वापरत होता. पण आता याच लोकरीचा वापर माणसांची तुटलेली हाडं जोडण्यासाठी आणि दातांच्या उपचारासाठी केला जाणार आहे. लंडनच्या ‘किंग्ज कॉलेज’मधील शास्त्रज्ञांनी लोकरीपासून हाडं बरी करणारं एक प्रायोगिक मटेरियल विकसित केलं आहे. नेमकं संशोधन काय? लोकरीपासून कसं जोडलं जाणार तुटलेलं हाड? याबद्दल सोप्या शब्दात जाणून घेऊया…
…म्हणून जगात 90% लोक ‘राइट-हँडेड’; ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांनी उलगडलं रहस्य
लोकरीमध्ये असं काय आहे?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की,मेंढीच्या लोकरीमध्ये असं नेमकं असत तरी काय? तर, आपल्या नखांमध्ये आणि केसांमध्ये जसं ‘केराटिन’ (Keratin) नावाचं मजबूत प्रोटीन असतं, तसंच ते मेंढ्यांच्या लोकरीमध्येही मुबलक प्रमाणात असतं. शास्त्रज्ञांनी या लोकरीवर रासायनिक प्रक्रिया करून ‘केराटिन’ वेगळं केलं आणि त्याचा अतिशय पातळ पडदा तयार केला. या पडद्याच्या शरीराच्या आत हाड वाढवण्यासाठी स्टँडसारखं काम करतात. जोपर्यंत हाड स्वतःहून निसर्गतः तयार होत नाही, तोपर्यंत हे मटेरियल त्याला आधार देतं.
गेल्या अनेक दशकांपासून हाडांच्या आणि दातांच्या उपचारात ‘कोलाजेन’ नावाचं मटेरियल वापरलं जातं. पण त्याच्या काही मर्यादा आहेत. जसे की कोलाजेन शरीरात खूप लवकर विरघळून किंवा गळून जातं. ज्या हाडांवर जास्त वजन किंवा दाब पडतो, तिथे कोलाजेन टिकत नाही. तसेच कोलाजेन तयार करण्याची आणि ते प्राण्यांच्या शरीरातून काढण्याची प्रक्रिया प्रचंड खर्चिक आणि गुंतागुंतीची आहे. या सर्व अडचणींवर मेंढ्यांच्या लोकरीपासून बनवलेलं ‘केराटिन’ हा उत्तम उपाय ठरणार आहे. एवढेच नाही तर, नवीन संशोधनात असे समोर आले आहे की, कोलाजेशनच्या तुलनेत केराटिनच्या पडद्यामुळे तयार झालेले नवीन हाड हे अधिक सुव्यवस्थित, मजबूत आणि अगदी हुबेहूब नैसर्गिक हाडासारखे होते.
मोबाईल बघून तुमचीही मुलं बनतंय का पिकी ईटर? नेमका प्रकार काय?
शास्त्रज्ञांनी आधी प्रयोगशाळेत मानवी पेशींवर आणि नंतर उंदरांवर याची चाचणी घेतली. ज्या उंदरांच्या कवटीला मोठं छिद्र होतं आणि जे हाड नैसर्गिकरित्या कधीच भरून निघणार नव्हतं, तिथे या लोकरीचा पडदा बसवण्यात आला. काही आठवड्यांनंतर जे निकाल आले ते थक्क करणारे होते. कोलाजेनच्या तुलनेत लोकरीच्या केराटिनने तयार झालेलं हाड हे दिसायला आणि रचनेने अगदी हुबेहूब नैसर्गिक आणि सुदृढ हाडासारखं होतं. हे हाड अतिशय मजबूत आणि व्यवस्थित रचलेलं होतं. तसेच ते शरीरातील इतर ऊतींसोबत (Tissues) अगदी सहज एकरूप झालं.
या शोधाचे दोन मोठे फायदे आहेत. एक तर, जगभरात शेती व्यवसायात मोठ्या प्रमाणात मेंढ्यांची लोकर टाकाऊ कचरा म्हणून फेकून दिली जाते. आता या कचऱ्याचा वापर थेट माणसांचे प्राण वाचवण्यासाठी किंवा उपचारासाठी होईल आणि दुसरं म्हणजे कोलाजेनपेक्षा लोकर खूप स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असल्यामुळे भविष्यात हाडांचे उपचार सामान्यांच्या बजेटमध्ये येऊ शकतात.
Cockroach : सोशल मीडियावर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची हवा पण, खऱ्या झुरळाची नेमकी स्टोरी काय?
रुग्णांना कधी मिळणार लाभ?
हे झाला संशोधनाचा विषय पण, कळीचा प्रश्न हा आहे की, रूग्णांना यापासून कधी मिळणार लाभ तर, हा शोध सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. प्रयोगशाळेत आणि प्राण्यांवर प्रयोग यशस्वी झाले असले, तरी माणसांवर प्रत्यक्ष वापर करण्यापूर्वी आणखी काही चाचण्या करणं आवश्यक असतं. त्यामुळे आणखी काही काळ या उपचारांसाठी वाट पाहावी लागणार आहे. पण येत्या काळात हाडांचे गंभीर आजार आणि डेंटल सर्जरी यासाठी शास्त्रज्ञांचा हा अविष्कार गेमचेंजर ठरणार, हे नक्की.
