Download App

SECR Recruitment : रेल्वेत विभागात बंपर भरती सुरू, 10 वी पास उमेदवारही करू शकतात अर्ज

  • Written By: Last Updated:

SECR Recruitment 2024: रेल्वेत नोकरीच्या (Railyway Job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या रायपूर विभागातील दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) आणि वॅगन रिपेअर शॉपमध्ये मोठ्या संख्येने शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीअंतर्गत नेमक्या किती जागा भरल्या जाणार आहे? या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे? भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? याच विषयी जाणून घेऊ.

पवार, ठाकरेंसमोर नांग्या, पण होणाऱ्या पराभवाचं खापर माझ्यावर कॉंग्रेस नेत्यांवर चव्हाणांचा पलटवार 

भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. त्यामुळं रेल्वे विभागाच्या देखरेखीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करते. सध्या सुरू असलेल्या भरती अतंर्गत एक हजाराहून अधिक पदे भरली जाणार आहे. उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पदांचा तपशील
डीआरएम कार्यालय रायपूर विभागातील पदांची संख्या
वेल्डर – 161
टर्नर – 54
फिटर- 207
इलेक्ट्रिशियन- 212
टायपिस्ट [इंग्रजी भाषा] – १५
टायपिस्ट [हिंदी भाषा] -8
संगणक ऑपरेट परिचालक आणि प्रोग्राम सहाय्यक – 1-
आरोग्य व स्वच्छता निरीक्षक-25
मशिनिस्ट-15
मेकॅनिक डिझेल – 81
मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर – 21
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स -35

एकूण- 844

अधिसूचना
file:///C:/Users/Online/Downloads/1712059326346-A%20A%20notification%202024-25.pdf

वॅगन रिपेअर शॉप, रायपूर पदसंख्या
फिटर-110
वेल्डर – 110
मशिनिस्ट – 15
टर्नर-14
इलेक्ट्रिशियन-14
संगणक ऑपरेट आणि प्रोग्राम सहाय्यक – ४
टायपिस्ट [इंग्रजी भाषा] – १
टायपिस्ट [हिंदी भाषा] -१
एकूण- 269

Sangli Loksabha : सांगलीची जागा ठाकरे गटाला कशी गेली? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं 

शैक्षणिक पात्रता
वरीलपैकी कोणत्याही पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10+2 शिक्षण पद्धतीत किमान 50% गुणांनी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही ट्रेडमध्ये आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज प्रक्रिया
जर उमेदवाराला वरीलपैकी कोणत्याही पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्याला ऑनलाइन माध्यमातून अर्ज भरावा लागेल. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने जॉब नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. कारण, अर्ज करतांना अर्जात कोणतीही चुक राहिल्यास किंवा अर्जात चुकीची माहिती भरल्यास अर्ज नाकारल्या जाईळ, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे जोडली पाहिजेत. नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 मे 2024 आहे.

follow us