Download App

Share Market : नफेखोरीनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; गुंतवणुकदारांचं तब्बल 1.29 लाख कोटींचं नुकसान

Share Market : भारतीय शेअर बाजार (Share Market)मोठ्या घसरणीसह बंद झाला. गेल्या दोन दिवसांपासून बाजारात सुरु असलेली तेजी संपुष्टात आली. सेन्सेक्स(Sensex) 377 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. तर निफ्टी 20,900 पर्यंत घसरला. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकदारांचं आज सुमारे 1.29 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं.

पहिल्यांदाच आमदार अन् राजस्थानचे मुख्यमंत्री झालेले भजनलाल शर्मा आहेत तरी कोण?

गुंतवणुकदारांनी अनेक मोठमोठ्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकींग (Profit booking)केल्यामुळे आज बाजारात मोठी घसरण झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही आज लाल रंगात बंद झाले. सर्वात मोठी घसरण ऊर्जा, तेल व वायू, ऊर्जा आणि उपयुक्तता शेअर्समध्ये झाली.

Priya Bapat: नवऱ्याच्या वाढदिवशी प्रिया बापटची रोमँटिक पोस्ट, पाहा फोटो…

दिवसभरातील व्यवहाराच्या शेवटी, बीएसई सेन्सेक्स 377.50 अंक किंवा 0.54 टक्क्यांच्या घसरणीसह 69,551.03 अंकांवर बंद झाला. त्याचवेळी NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 90.70 अंकांनी किंवा 0.43 टक्क्यांनी घसरला आणि 20,906.40 च्या स्तरावर बंद झाला.

BSE वर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 12 डिसेंबर रोजी 349.80 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली घसरल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी म्हणजेच 11 डिसेंबरला ते 351.09 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, BSE मध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.29 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. अर्थात गुंतवणुकदारांच्या संपत्तीमध्ये सुमारे 1.29 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

सर्वाधिक घसरलेले 5 शेअर्स…
सेन्सेक्समधील उर्वरित 19 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. त्यातही मारुती सुझुकीच्या शेअर्समध्ये 1.87 टक्क्यांनी घसरण झाल्याची दिसून आली. दुसरीकडे, सन फार्मा, इंडसइंड बँक, टायटन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चे समभाग 1.43 टक्के ते 1.77 टक्क्यांपर्यंत घसरुन बंद झाले.

BSE वर आज, शेअर्सची संख्या वाढीच्या तुलनेत घसरणीसह बंद झाली. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,905 शेअर्सची खरेदी-विक्री झाली. यापैकी 1,753 शेअर्स वाढीसह बंद झाले. 2,035 शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

तर 117 शेअर्समध्ये कोणताही चढउतार न होता फ्लॅट बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 390 शेअर्सनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 21 शेअर्सनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळी गाठल्याचे पाहायला मिळाले.

Tags

follow us