Share Market : भाजपच्या दणदणीत विजयानंतर Investor सुसाट; झोळीत आले 4 लाख कोटी
BJP Victory Effect On Share Market : पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोठा विजय मिळाला. तर, तेलंगणात बीआरएसचा धुव्वा उडवत काँग्रेसने विजय मिळवला. या निकालांचा थेट परिणाम शेअर बाजारावरही (Share Market) दिसून आला. आज (दि.4) सकाळी शेअर बाजार विक्रमी अंकानी सुरू झाला. 3 डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांचा बाजारावर सकारात्मक परिणाम झाल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. सर्व कंपन्यांचे बाजार भांडवल 4.09 लाख कोटी रुपयांनी वाढून 341.76 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. सुरुवातीच्या व्यवहारातच बाजारात ही मोठी उलाढाल दिसून आली. ट्रेडिंगच्या पहिल्या 15 मिनिटांतच गुंतवणूकदारांच्या झोळीत 4 लाख कोटींचा नफा जमा झाला.
नवीन गुंतवणूक करण्यात आली.
उत्तरेत भाजपचा बंपर विजय; आनंदाच्या भरात बावनकुळेंनी फोडलं मुख्यमंत्री अन् शपथविधीचं ठिकाण
बाजाराची सुरूवात होताच बीएससी 1,024.29 (1.51%) च्या भक्कम वाढीसह 68,504.43 ने सुरू झाला तर, दुसरीकडे, NSE निफ्टी 304.40 (1.50%) अंकांनी झेप घेत 20,572.30 च्या पातळीवर पोहोचला. चारपैकी तीन राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या दणदणीत विजयामुळे शेअर बाजारातील गुंतणुदारांनी 4 लाख कोटींची गुंतवणूक केली.
मिडकॅपने गाठले नवीन शिखर
शेअर बाजार सुरू झाल्यानंतर मिडकॅपने नवीन शिखर गाठले. निफ्टी मिडकॅप शेअर्समध्ये 105.95 अंकांची वाढ दिसून आली. बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅपमध्ये 4.09 लाख कोटींची वाढ होऊन ते 341.76 लाख कोटींवर पोहोचले.
“पराभवाचा राग संसदेत काढू नका” : अधिवेशनाच्या सुरुवातीलाच PM मोदींचा काँग्रेसला टोला
अदानी समूहाचे शेअर्स 14 टक्क्यांनी वाढले
शेअर बाजार उघडल्यानंतर अदानी एनर्जी सोल्युशन्सच्या शेअर्स 14 टक्क्यांनी वधारले तर अदानी पॉवर आणि अदानी ग्रीन एनर्जी 12 टक्क्यांनी वधारले. अदानी एंटरप्रायझेस, अदानी टोटल गॅस आणि अदानी विल्मारच्या शेअर्समध्ये 6-8% पर्यंत वाढ झाली. निफ्टीमध्ये अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स 4-7% वाढले.
पक्षाकडून साईड लाईन झाल्यानंतरही मध्यप्रदेशात बाजीगर ठरले मामांजी; असा जिंकला गड
या कारणांमुळे शेअर बाजारात आली तेजी आली
भारतातील तीन प्रमुख उत्तरेकडील राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत आणि दक्षिणेत काँग्रेसला मिळालेल्या स्पष्ट जनादेशामुळे शेअर बाजारात तेजीचे चित्र दिसून आले. चारही राज्यांमध्ये स्थिर सरकार स्थापन होण्याचं चित्र दिसू लागल्याचा चांगला परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. याशिवाय येनच्या नुकत्याच झालेल्या वाढीमुळे जपानचा निक्केईमध्ये 0.4 टक्के घसरला आहे. यामुळे आशिया-पॅसिफिक प्रदेश म्हणजेच दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाच्या शेअर्समध्ये वाढ झाली. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचे दिसून आला.